Maratha Reservation : राज्य सरकारला हा अधिकार आहे का ?; राज ठाकरे यांचा प्रश्न

196
Maratha Reservation : राज्य सरकारला हा अधिकार आहे का ?; राज ठाकरे यांचा प्रश्न
Maratha Reservation : राज्य सरकारला हा अधिकार आहे का ?; राज ठाकरे यांचा प्रश्न

मी जर चुकत नसेल, तर तमिळनाडूतदेखील असेच प्रकरण घडले होते. राज्य सरकारने आरक्षण(Maratha Reservation) दिले आणि ती केस अजूनही सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्याचे पुढे काहीही झाले नाही. राज्य सरकारला मुळात हा अधिकार आहे का ? हा विषय केंद्र सरकारचा असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आहे, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.(Maratha Reservation)

(हेही वाचा- Seat Allocation Crisis : अखिलेश यादव यांच्यामुळे काँग्रेस अडचणीत )

मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण(Maratha Reservation) देणारे विधेयक सभागृहात मंजूर करण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी याविषयी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्या वेळी त्यांनी तमिळनाडू प्रकरणाशी महाराष्ट्राशी तुलना केली.(Maratha Reservation)

राज ठाकरे (Raj Thackeray) पुढे म्हणाले की, मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सुरू आहे. समाजाने जागृत रहावे. सरकारने जाहीर केले म्हणजे आनंद मानण्याचा हा विषय नाही. सरकारने 10 टक्के आरक्षण(Maratha Reservation) दिले म्हणजे नेमके काय केले ? कशात 10 टक्के आरक्षण दिले ? हे मराठा समाजाने सरकारला विचारले पाहिजे. सरकारला या गोष्टीचे अधिकार आहेत का ? परत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार आणि पुन्हा सरकार म्हणणार आता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले, आम्ही काही करु शकणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी करायच्या याला काही अर्थ आहे का? (Maratha Reservation)

(हेही वाचा- Lok Sabha Elections : निवडणुकीपूर्वी भाजपचा नवा नारा; ‘फिर एक बार मोदी सरकार’ असेल प्रचार गीत )

आज देशात इतकी राज्ये आहेत. त्या राज्यांत अनेक जाती आहेत. त्यांचे पण विषय आहेत. एका राज्यात एका जातीबद्दल असे नाही करता येत. या सगळ्याकडे समाजाने लक्ष देणे गरजेचे आहे. राज्यात सध्या काय सुरू आहे. काहीच कळत नाही. राज्यासमोर मोठे भीषण प्रश्न आहेत. फेब्रुवारी महिना आहे आणि आत्ताच दुष्काळाचा पाण्याचा प्रश्न इतका मोठा आहे. त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. निवडणुका, जाती-पातीचे राजकारण, आरक्षण याकडे सर्वांचे लक्ष वळवायचे आणि मुळ जो प्रश्न आहे त्याकडे दुर्लक्ष करायचे. लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर राज्यात वा देशात काहीच सुरू नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी राज्यातील समस्यांकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.(Maratha Reservation)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.