Sangli Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सांगली येथे भव्य मोर्चा

120
Sangli Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सांगली येथे भव्य मोर्चा
Sangli Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सांगली येथे भव्य मोर्चा

मराठा आरक्षण मागणीसाठी आणि अंतरवली सराटी येथे आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी रविवारी सांगलीत भव्य मोर्चा काढण्यात आला. (Sangli Maratha Kranti Morcha) विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील पुतळा व राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करुन मोर्चाला प्रारंभ झाला. त्यानंतर 100 वर्षीय जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. हजारोंचा समुदाय मोर्चात सहभागी झाला. २ किलोमीटरच्या मार्गावर विविध संस्था, संघटनांच्या वतीने अल्पोपहार, पाणी व्यवस्था करण्यात आली. राममंदिर चौकामध्ये मोर्चाच्या वतीने एका तरुणीसह ५ युवकांनी आरक्षणाच्या मागणीबाबत भाषण केले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाचे वाचन करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला सर्व राजकीय पक्ष, संघटनांनी पाठिंबा देत सहभाग नोंदवला.

(हेही वाचा – Lower Paral flyover : लोअर परळ उड्डाणपूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू होणार)

या मोर्चात महिला, तरुणींचा लक्षणीय सहभाग होता. मोर्चा झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संभाजी भिडे हेसुद्धा सहभागी झाले होते. राममंदिर चौकात मोर्चाच्या वतीने एका तरुणीसह ५ युवकांनी आरक्षण मागणीसाठी भाषण केले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाचेही वाचन करण्यात आले. ‘आतापर्यंत मूक असणारा मोर्चा आता घोषणापर्यंत गेला आहे. जर सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत योग्य तो विचार केला नाही, तर आणखी आक्रमक पध्दतीने मराठा मोर्चा रस्त्यावर उतरेल’, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा संयोजकानी दिला. (Sangli Maratha Kranti Morcha)

मराठा समाजाकडून करण्यात आलेल्या मागण्या

1. ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घेत असलेल्या जातींचे फेरसर्वेक्षण करुन या यादीतून प्रगत जातीना वगळण्यात यावे, राज्यातील ओबीसी जातींची संख्या व त्यांच्या लोकसंख्येची जनगणना करुन सर्वेक्षण करा.

2. राज्यातील फुगीर आरक्षण कमी करुन मराठा समाजाचा गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाचा 50% ओबीसीमध्ये समावेश करावा.

3. 19/12/2018 च्या शासन निर्णयामुळे समांतर आरक्षण अंतर्गत अन्याय झालेल्या PSI राज्यसेवा 2017,  RTO 2017 मधील महिलांना शासकीय सेवेत समावून घ्या. तसेच EWS TO PSI 2020, SEBC TO EWS महाराष्ट्र इंजिनिअरिंग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम उमेदवार नियुक्त्यांचा प्रश्न सोडवा.

4. समांतर आरक्षण व खुला सर्वसाधारण गटात अर्ज, दावा आणि स्पर्धा करणाऱ्या उमेदवार प्रवर्गात समावेश करणारा कायदा बनवून ओपनमध्ये संरक्षण द्या.

5. मराठा तरुणांच्या शैक्षणीक अडचणी व वसतीगृहाचे प्रश्न सोडवा

6. अण्णासाहेब पाटील सक्षम बनवून तरुणांना येणाऱ्या अडचणी सोडवा

7. सारथी संस्थेला मनुष्यबळ व वाढीव निधी देऊन MOA नुसार सर्व योजना सुरू करा (Sangli Maratha Kranti Morcha)

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.