IND Vs SL Final Asia Cup : श्रीलंकेचा धुव्वा उडवत भारताने आठव्यांदा जिंकला आशिया चषक

श्रीलंकेने दिलेले ५१ धावांचे माफक आव्हान भारताने ६.१ षटकात आरामात पार केले.

18
IND Vs SL Final Asia Cup : श्रीलंकेचा धुव्वा उडवत भारताने आठव्यांदा जिंकला आशिया चषक
IND Vs SL Final Asia Cup : श्रीलंकेचा धुव्वा उडवत भारताने आठव्यांदा जिंकला आशिया चषक

भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कपच्या फायनल सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेसाठी मोहम्मद सिराज डोकेदुखी ठरला. सिराजने घेतलेल्या६ विकेट्सच्या जोरावर भारताने श्रीलंकेला ५० धावात गुंडाळले. तर शुभमन गिल आणि इशान किशन या जोडीने अवघ्या सहा ओव्हर मध्येच हे रन अगदी सहजरीत्या करून हा आशिया कप स्वतःच्या खिशात घातला.
श्रीलंकेने दिलेले ५१ धावांचे माफक आव्हान भारताने ६.१ षटकात आरामात पार केले. भारताने दहा विकेटने श्रीलंकेचा पराभव केला. शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी नाबाद ५१ धावांची भागिदारी करत भारताला सहज विजय मिळवून दिला. शुभमन गिल याने १९ चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने नाबाद २७ धावांची खेळी केली. तर ईशान किशन याने १८ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद २३ धावांची खेळी केली. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात लंकेला पहिला धक्का दिला तर सिराजने चौथ्या षटकात ४ विकट्स घेत श्रीलंकेची अवस्था ४ षटकात ५ बाद १२ धावा अशी केली.सिराजने श्रीलंकेचा कर्णधार दसुन शानकाची शिकार करत आपला पाचवा बळी टिपला. त्यानंतर १७ धावा करणाऱ्या कुसल मेंडीसला देखील बाद करत लंकेला सातवा आणि मोठा धक्का दिला. मेंडीसच्या रूपाने सिराजने आपला सहावा बळी टिपला.

(हेही वाचा :IND Vs SL Final Asia Cup :  केवळ ५० धावांतच श्रीलंकेचा डाव गुंडाळला)

हार्दिक पांड्या आणि बमराहने श्रीलंकेची अवस्था ७बाद ३३ धावात केली. त्यानंतर हार्दिक पांड्याने दुनिथ वेल्लालागे (८), प्रमोद मदुशान (१) आणि मथिशा पथिराना (0) यांची विकेट घेत लंकेचा डाव ५० धावात गुंडाळला. आशिया कपच्या फायनलमध्ये पावसाचा व्यत्यय येईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र भारताने लंकेला ५० धावात गुंडाळात सामना लवकर उरण्याची शक्कल लढवली आणि वरूण राजांना देखील मात देण्याचा प्रयत्न केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.