Manoj Jarange Thane Sabha : पोलिसांकडून वाहतूक मार्गात मोठे बदल, कोणते रस्ते राहणार बंद?

8
Manoj Jarange Thane Sabha : पोलिसांकडून वाहतूक मार्गात मोठे बदल, कोणते रस्ते राहणार बंद?

मनोज जररांगे पाटील (Manoj Jarange Thane Sabha) पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ते आज म्हणजेच मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी ठाणे येथे आपली सभा घेणार आहेत. त्यामुळे ठाण्याच्या वाहतूकीत मोठा बदल करण्यात आला आहे.

जरांगे पाटील यांची ठाण्याच्या (Manoj Jarange Thane Sabha) गडकरी रंगायतन नाट्यगृहात जाहीर सभा होणार असून त्याआधी कल्याणहून ठाणे शहरात दाखल होणाऱ्या पाटील यांचा भव्यदिव्य रोड शो होणार आहे. या अनुषंगाने शहरात वाहतूककोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने वाहतूक बदल केले आहेत.

(हेही वाचा – Supreme Court : न्यायाधीश नियुक्तीत पसंती – नापसंतीचे धोरण अयोग्य)

असे असतील बदल

१. डॉ. मुस चौक येथून गडकरी चौकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना डॉ. मुस चौकाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने टॉवरनाका, टेंभीनाकामार्गे पुढे जातील. (Manoj Jarange Thane Sabha)

२. गडकरी चौक येथून डॉ. मुस चौकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना गडकरी चौकाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने अल्मेडा चौक, वंदना सिनेमा चौक, गजानन चौक, तीन पेट्रोल पंप, हरिनिवासमार्गे पुढे जातील.

३. न्यू इंग्लिश शाळा येथून राम मारूती रोडच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना न्यू इंग्लिश शाळेपासून काही अंतरावर प्रवेशबंदी असेल. येथील वाहने बेडेकर रुग्णालय, राजमाता वडापावमार्गे पुढे जातील.

(हेही वाचा – Lalit Patil: ललित पाटील प्रकरणात अटकेत असलेल्या दोन पोलिसांच्या बडतर्फीचे आदेश)

४. पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स चौक येथून तलावपाळीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना पु. ना. गाडगीळ चौकाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने श्रद्धा वडापाव, गजानन महाराज चौक, राजमाता वडापावमार्गे पुढे मार्गस्थ होतील. (Manoj Jarange Thane Sabha)

नोकरदारांच्या अडचणीत वाढ

सकाळी कामानिमित्ताने ठाणे रेल्वे स्थानाकाकडे येणाऱ्या रिक्षा, खासगी वाहने व दुचाकीस्वारांना या वाहतूक बदलांचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. सकाळी दहा वाजता जरांगे-पाटील यांची सभा असल्याने पहाटेपासूनच ठिकठिकाणांहून मराठा समाजातील कार्यकर्ते ठाण्यात दाखल होत आहेत. (Manoj Jarange Thane Sabha)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.