Manoj Jarange-Patil: १० फेब्रुवारीला पुन्हा उपोषण करणार, मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारला इशारा

मी एवढ्यावर थांबणाऱ्यातला नाही. सरकारने दिलेले अश्वासन पूर्ण करण्यासाठी पुन्हा उपोषण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

338
Manoj Jarange-Patil: १० फेब्रुवारीला पुन्हा उपोषण करणार, मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारला इशारा
Manoj Jarange-Patil: १० फेब्रुवारीला पुन्हा उपोषण करणार, मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारला इशारा

लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत उपोषण करण्यासाठी रवाना झाल्यानंतर सरकारने सर्व मागण्या करत अध्यादेश काढणार असल्याचे आश्वासन दिले. या अश्वासनानंतर मराठा आंदोलकांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला, मात्र या घोषणेनंतर जरांगे पाटील यांनी मंगळवारी रायगड येथे पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, मी एवढ्यावर थांबणाऱ्यातला नाही. सरकारने दिलेले अश्वासन पूर्ण करण्यासाठी पुन्हा उपोषण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी ते म्हणाले की, सरकारने दिलेला शब्द पाळावा अशी आमची भूमिका आहे. सगेसोयऱ्यांनादेखील आरक्षणात घेण्याची आमची मागणी आहे.

(हेही वाचा – Rafael Nadal Racquet : राफेल नदालच्या फ्रेंच ओपन जिंकून दिलेल्या रॅकेटला मिळाले १.११ लाख अमेरिकन डॉलर)

पुन्हा उपोषणाला बसणार…
असे सांगून ते पुढे म्हणाले की, कायद्यावर आमचा विश्वास आहे, पण याबाबत सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी सुरू करावी तसेच आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.