Manipur : इंफाळ विमानतळावर अनोळखी ड्रोन; भारतीय वायूदलाने घेतला ‘हा’ निर्णय

मणिपूरची राजधानी इंफाळच्या विमानतळाजवळ एक उडणारी अनोळखी ड्रोन  (UFO – Unidentified Flying Object) दिसले. त्यानंतर भारतीय वायूसेनेने दोन राफेल लढाऊ विमाने यूएफओ शोधण्यासाठी पाठवली. दुपारी २.३० वाजता ही घटना घडली.

11
Manipur : इंफाळ विमानतळावर अनोळखी ड्रोन; भारतीय वायूदलाने घेतला 'हा' निर्णय
Manipur : इंफाळ विमानतळावर अनोळखी ड्रोन; भारतीय वायूदलाने घेतला 'हा' निर्णय

इंफाळ विमानतळाजवळ एक उडणारी अनोळखी वस्तू (यूएफओ) दिसल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. (Manipur) या यूएफओचा शोध घेण्यासाठी दोन राफेल विमाने पाठवली होती.

मणिपूरची राजधानी इंफाळच्या विमानतळाजवळ एक उडणारी अनोळखी ड्रोन  (UFO – Unidentified Flying Object) दिसले. त्यानंतर भारतीय वायूसेनेने दोन राफेल लढाऊ विमाने यूएफओ शोधण्यासाठी पाठवली. दुपारी २.३० वाजता ही घटना घडली. यामुळे अनेक व्यावसायिक विमानांच्या उड्डाणांची वेळ बदलावी लागली. संरक्षण विभागातील सूत्रांनी ही बातमी दिली आहे. (Manipur)

(हेही वाचा – Gurpatwant Singh Pannu : खलिस्तानवादी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या विरोधात NIA ची मोठी कारवाई)

ड्रोनच्या शोधात राफेल 

या ड्रोनमुळे विमानतळ प्रशासनाचा गोंधळ उडाला. ही बातमी मिळताच इंफाळजवळच्या भारतीय वायूदलाच्या तळावरून एक राफेल लढाऊ विमान यूएफओच्या शोधात पाठवण्यात आले. अत्याधुनिक सेन्सर्स असलेल्या या विमानाने संशयित भागात यूएफओ शोधण्यासाठी उड्डाण केले. ज्या भागात यूएफओ दिसल्याची बातमी मिळाली होती, त्या भागात राफेलने शोधाशोध केली. यूएफओ कुठेही सापडले नाही. (Manipur)

एअर डिफेन्स रिस्पॉन्स मेकॅनिझम सक्रीय 

यूएफओच्या शोधात पाठवण्यात आलेले पहिले राफेल विमान परतल्यानंतर वायूदलाने आणखी एक राफेल विमान यूएफओच्या शोधात पाठवले. दुसऱ्या राफेल विमानाच्या पायलटलाही यूएफओ आढळले नाही. संरक्षण अधिकारी यूएफओची महिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

(हेही वाचा – Online Fraud : डॉक्टरला ३०० रुपयांची लिपस्टिक पडली लाखात)

यूएफओच्या बातमीनंतर वायूदलाने एअर डिफेन्स रिस्पॉन्स मेकॅनिझम ही प्रणाली सक्रीय केली आहे. वायूदलाच्या ईस्टर्न कमांडने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारतीय वायूदलाने इंफाळ विमानतळावरील व्हिडीओच्या आधारावर सुरक्षेसाठी यंत्रणा राबवली आहे. (Manipur)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.