Malshej Ghat Skywalk: माळशेजच्या सौंदर्यात भर पडणार; अर्थसंकल्पात मिळाली मंजुरी

142
Malshej Ghat Skywalk: माळशेजच्या सौंदर्यात भर पडणार; अर्थसंकल्पात मिळाली मंजुरी
Malshej Ghat Skywalk: माळशेजच्या सौंदर्यात भर पडणार; अर्थसंकल्पात मिळाली मंजुरी

राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. शुक्रवारी विधानभवनात राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी राज्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. त्याचबरोबर पायाभूत सुविधांसाठीही काही निधी तसंच, प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही अर्थसंकल्पात काही तरतूदी करण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात असलेल्या माळशेज घाटाबाबतही घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. (Malshej Ghat Skywalk)

माळशेज घाटात काचेचा स्काय वॉक

ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटात (Malshej Ghat Skywalk) पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होते. याच माळशेज घाटात आता पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काचेची व्हि्विग गॅलरी अर्थात काचेचा स्काय वॉक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. माळशेज घाटात हा काचेचा स्काय वॉक उभारण्यासाठी आता चालना मिळणार असून, त्यामुळे मुरबाड तालुका पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे. भारतातील हा पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. (Malshej Ghat Skywalk)

भारतातील हा पहिला प्रकल्प

माळशेज घाटात चीन देशातील काचेच्या व्हि्विंग गॅलरी प्रमाणेच भव्य गॅलरी उभारण्याचा प्रस्ताव आमदार किसन कथोरे यांनी सादर केला होता. राज्यात पर्यटकांच्या वाढीसाठी तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी माळशेज घाटात काचेचा वि्हिंग गॅलरी चा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. भारतातील हा पहिला प्रकल्प असेल. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक माळशेज घाटाकडे आकर्षित होतील. त्याचबरोबर, स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. (Malshej Ghat Skywalk)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.