Mall Fire System : मालाड येथील मॉलची वीज आणि पाणी जोडणी तोडणार

123
Mall Fire System : मालाड येथील मॉलची वीज आणि पाणी जोडणी तोडणार

अग्निसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या मालाड पश्चिम येथील मॉलमध्ये सोमवारी ३ जून २०२४ रोजी आग लागल्याची दुर्घटना घडली. याची गंभीर दखल घेत अग्निशमन दलाने हा मॉल असुरक्षित घोषित करून कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. या मॉलची वीज जोडणी आणि पाणी जोडणी खंडित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून मालाड पोलिस ठाण्यामार्फत हा मॉल बंद करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती. मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे. (Mall Fire System)

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी आणि उप आयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड यांनी मुंबई अग्निशमन दलास महानगरपालिका हद्दीतील मॉल्सची आकस्मिक तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुंबई अग्निशमन दलाच्या विशेष पथकाने २६ मे २०२४ ते ३० मे २०२४ या कालावधीत मुंबईतील विविध ६८ मॉलची आकस्मिक तपासणी केली. (Mall Fire System)

(हेही वाचा – पुलवामा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत Lashkar-e-Taiba च्या आतंकवाद्याचा खात्मा)

मालाड पश्चिम येथील ‘मेसर्स द मॉल’ या मॉलला मागील आठवड्यात आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, सोमवारी ३ जून २०२४ रोजी याच मॉलमध्ये आगीची दुर्घटना घडली. याची गंभीर दखल घेत मुंबई अग्निशमन दलाने हा मॉल असुरक्षित घोषित करून कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. (Mall Fire System)

या कारवाईत मुंबई अग्निशमन दलाने महाराष्ट्र अग्निबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना २००६ अन्वये देण्यात आलेली ‘फायर अॅक्ट नोटीस’ रद्द करून मॉल ‘तात्काळ असुरक्षित’ घोषित करण्याची सक्त कारवाई केली आहे. तसेच मॉल व्यवस्थापनाने अग्निशमन सुरक्षा यंत्रणाबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने नव्याने नोटिस बजावली. त्यानुसार सदर मॉलची वीज जोडणी आणि पाणी जोडणी खंडित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच मालाड पोलिस ठाण्यामार्फत हा मॉल रिकामा करण्यास व अभियोग दाखल करून सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे प्रमुख अग्निशमन अधिकारी (प्रभारी) संतोष सावंत यांनी सांगितले. (Mall Fire System)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.