Mall Fire System : मुंबईतील १७ मॉल असुरक्षित; अग्निशमन दलाने बजावली नोटीस

111
Mall Fire System : मुंबईतील १७ मॉल असुरक्षित; अग्निशमन दलाने बजावली नोटीस

मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने दिनांक २६ मे २०२४ ते ३० मे २०२४ या कालावधीत मुंबईतील ६८ मॉलची आकस्मिक तपासणी केली. या तपासणीत ४८ मॉलमध्ये अग्निप्रतिबंधक व सुरक्षा उपाययोजनांची पूर्तता करण्यात आल्याचे आढळून आले. तर, अग्निसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या १७ मॉल व्यवस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस बजावलेल्यांपैकी एक असलेल्या मालाड पश्चिम येथील मॉलमध्ये सोमवारी ३ जून २०२४ रोजी आग लागल्याची दुर्घटना घडली. याची गंभीर दखल घेत अग्निशमन दलाने हा मॉल असुरक्षित घोषित करून कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. (Mall Fire System)

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी आणि उप आयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड यांनी मुंबई अग्निशमन दलास महानगरपालिका हद्दीतील मॉल्सची आकस्मिक तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुंबई अग्निशमन दलाच्या विशेष पथकाने २६ मे २०२४ ते ३० मे २०२४ या कालावधीत मुंबईतील विविध ६८ मॉलची आकस्मिक तपासणी केली. (Mall Fire System)

(हेही वाचा – Salman Khanच्या हत्येसाठी ७० मुलांची टोळी; परदेशात बसलेल्या लेडी डॉनची बिष्णोई टोळीला मदत)

एकूण ६८ मॉल्सपैकी ४८ मॉलमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची व सुरक्षेची पूर्तता करण्यात आल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. तर १७ मॉल व्यवस्थापनांनी अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या १७ मॉल्सला महाराष्ट्र अग्निबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना २००६ अन्वये ३० दिवसांचा कालावधी देत कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या ३० दिवसांत आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी सांगण्यात आले आहे. (Mall Fire System)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.