Malad Manori : मालाड मनोरीतील पाचघर उद्यानाचा होणार विकास

मालाड मनोरी येथील कोळीवाडा येथील पाचघर उद्यानाचे नुतनीकरण करण्यात येणार असून मागील काही महिन्यांपासून या उद्यानाची अवस्था बकाल झाली आहे.

331
Malad Manori : मालाड मनोरीतील पाचघर उद्यानाचा होणार विकास
Malad Manori : मालाड मनोरीतील पाचघर उद्यानाचा होणार विकास

मालाड मनोरी येथील कोळीवाडा येथील पाचघर उद्यानाचे (Five Ghar Udyan) नुतनीकरण करण्यात येणार असून मागील काही महिन्यांपासून या उद्यानाची अवस्था बकाल झाली आहे. त्यामुळे या उद्यानाचे नुतनीकरणासह सुशोभीकरण करण्यात येणार आहे. (Malad Manori)

महापालिकेच्या पी उत्तर विभागातील मनोरी परिसरातील कोळी बांधवांच्या मागणीनुसार स्थानिक आमदार सुनील राणे यांनी महापालिकेसोबत पत्रव्यवहार करत या उद्यानाचे नुतनीकरण करण्याची शिफारस केली होती. मनोरी कोळीवाड्यातील रहिवाशांना मोकळ्या सार्वजनिक जागाचा उपलब्ध नसल्याने महापालिकेने मनोरी गाव येथील पाचघर उद्यानाचे (Five Ghar Udyan) नुतनीकरण व विकासाचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. (Malad Manori)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Session : हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले; पुढील अधिवेशन ‘या’ तारखेला होणार)

महानगरपालिका आयुक्तांच्या मान्यतेनुसार या ठिकाणी चालण्याची मार्गिका (Walking Pathway), गजेबो, लहान मुलांकरिता खेळण्याची व्यवस्था, वाचनालय, टॉयलेटची डागडुजी, संरक्षक भितीची डागडुजी आदी कामे करण्यात येणार आहेत. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये यश ऋषभ ब्रदर्स या कंपनीची निवड झाली असून या कामांसाठी सुमारे सव्वा दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पुढील चार महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. (Malad Manori)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.