Malabar Hill Reservoir Reconstruction : दक्षिण मुंबईकरांनो पाणी गाळून आणि उकळून प्या

जलाशयातील कप्पा पूर्ण रिक्त करुन पुन्हा भरण्यात आला आहे. त्यामुळे काही विभागातील नागरिकांना एक दिवसासाठी (२४ तास) गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

1785
Malabar Hill Reservoir Reconstruction : दक्षिण मुंबईकरांनो पाणी गाळून आणि उकळून प्या
Malabar Hill Reservoir Reconstruction : दक्षिण मुंबईकरांनो पाणी गाळून आणि उकळून प्या

मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी विचाराधीन असल्याने आय. आय. टी. पवईचे प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ नागरिक, महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ समितीने महापालिकेच्या मलबार हिल जलाशयामधील कप्पा क्रमांक १ ची सोमवारी (१८ डिसेंबर २०२३) रोजी पाहणी केली. या कारणाने जलाशयाचा कप्पा क्रमांक १ रिक्त करण्यात आला होता. सध्याच्या प्रस्तावाचे पुनरावलोकन करुन या समितीने योग्य कार्यपद्धती सुचविणे अपेक्षित आहे. त्यामुळे शहर भागातील जनतेने येत्या काही दिवसांमध्ये पाणी गाळून व उकळून प्यावे असे आवाहन महापालिका जल अभियंता विभागाने केले आहे. (Malabar Hill Reservoir Reconstruction)

मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी विचाराधीन असल्याने आय. आय. टी. पवईचे प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ नागरिक, महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ समितीने सोमवारी सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत या २ तासांच्या कालावधीत जलाशयाची अंतर्गत पाहणी केली. तज्ज्ञ समितीच्या भेटीचा शेवटचा टप्पा सोमवारी पार पडला. (Malabar Hill Reservoir Reconstruction)

(हेही वाचा – I.N.D.I. Alliance : बैठकीआधीच इंडी आघाडीत मतभेदाचे सत्र सुरू)

दक्षिण मुंबईतील नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे

मलबार हिल जलाशय पुनर्बांधणी संदर्भात तज्ज्ञ समितीमार्फत सोमवारी (१८ डिसेंबर २०२३) अंतर्गत पाहणी करण्यात आली. या काळात जलाशयाचा कप्पा रिक्त करण्यात आल्याने शहर विभागात काही परिसरात पाणीकपात करण्यात आली होती. त्यामध्ये ए, सी, डी विभागांचा समावेश होता. जलाशयातील कप्पा पूर्ण रिक्त करुन पुन्हा भरण्यात आला आहे. त्यामुळे काही विभागातील नागरिकांना एक दिवसासाठी (२४ तास) गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, अशी विनंती महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. (Malabar Hill Reservoir Reconstruction)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.