Mumbai-Pune Express Way : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ११ वाहने एकमेकांवर आदळली   

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. 

172
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ११ वाहने एकमेकांवर आदळली 

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे Mumbai-Pune Express Way वर एक भीषण विचित्र अपघात झाला. त्यात तब्बल ११ वाहने एकमेकांना धडकली. एक चारचाकी तर अक्षरशः दुसऱ्या वाहनावर उभी राहिली. खोपोली एक्झिट जवळ हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

accident 1 1

या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात इतका भीषण होता की, अनेक गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. ट्रक आणि अनेक कार यांची जोरदार धडक झाली.

या घटनेमुळे Mumbai-Pune Express Way द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातामुळे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यात अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्याचे दिसत आहे. यात ट्रकही कारला धडकल्याचे दिसत आहे. NHAI टीम व्यतिरिक्त पोलीसही घटनास्थळी पोहोचले आहेत. Mumbai-Pune Express Way एक्स्प्रेस वेवर जाम होऊ नये म्हणून हळूहळू वाहने हटवली जात आहेत. त्याचबरोबर अपघातग्रस्त वाहने मुख्य रस्त्यावरून हटविण्याचे कामही करण्यात येत आहे. हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत माहिती मिळालेली नाही.

(हेही वाचा साध्या एसटी बसेस मुंबई-पुणे एक्सप्रेसवरून धावणार नाहीत; कारण… )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.