Drought : राज्याला दुष्काळाच्या झळा; टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी गावांच्या संख्येत वाढ 

100

दुष्काळाने (Drought) हळूहळू राज्याला विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. सरकारने चारच दिवसांपूर्वी ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला, मात्र नोव्हेंबर महिना सुरु होताच त्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येत आहे. सध्या राज्यात एकूण ३१२ गावांमध्ये तर ९३९ वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जाऊ लागला आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात टँकर गरज नव्हती 

राज्यात दुष्काळामुळे (Drought) अनेक गावे आणि वाड्यांमधील पाणीटंचाईचा प्रश्न आता कठीण झाला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची आणि वाड्यांची संख्या वाढलेली असल्याचे अहवालातून दिसून आले आहे. राज्य सरकारच्या पाणीपुरवठा विभागाने नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्याचा टँकरने पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या गावांची आणि वाड्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार राज्यात सध्याच्या घडीला ३२२ टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. यात ३८ सरकारी आणि २८४ खासगी टँकरचा समावेश आहे. मुख्य म्हणजे, गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात कुठेही टँकरने पाणीपुरवठा केला जात नव्हता.

(हेही वाचा Maharashtra Government : धनगर समाजासाठी शक्तीप्रदत्त समिती; एअर इंडियाची इमारत ताब्यात घेणार; राज्य मंत्रिमंडळात महत्वाचा निर्णय)

सांगली, सातारा, नाशिकमध्ये सर्वाधिक गावे दुष्काळाच्या छायेत

सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक वाड्यांमध्ये सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे या आकडेवारीतून दिसते. सध्या सांगलीतील २७१ वाड्यांमध्ये, तर ३२ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यापाठोपाठ सातारा जिल्ह्यात २६८ वाड्यांमध्ये आणि ६३ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिकमधील २३६ वाड्यांमध्ये आणि १०६ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. नाशिकमध्ये सर्वाधिक टँकरची संख्या नोंदविण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.