Maharashtra School : आता मुलांच्या झोपेची चिंता मिटली; चौथीपर्यंतच्या सर्व शाळा सकाळी 9 वाजल्यापासून

Maharashtra School : आता मुलांच्या झोपेची चिंता मिटली; चौथीपर्यंतच्या सर्व शाळा सकाळी 9 वाजल्यापासून

373
Maharashtra School : आता मुलांच्या झोपेची चिंता मिटली; चौथीपर्यंतच्या सर्व शाळा सकाळी 9 वाजल्यापासून
Maharashtra School : आता मुलांच्या झोपेची चिंता मिटली; चौथीपर्यंतच्या सर्व शाळा सकाळी 9 वाजल्यापासून

भल्या सकाळी मुलांना शाळेसाठी उठवणारे पालक आणि ‘अजून ५ मिनिटे’ असे म्हणून पुन्हा झोपणारी मुले हे दृश्य आता पहायला मिळणार नाही. लहान मुलांची झोप पूर्ण होण्यासाठी सकाळच्या शाळांच्या वेळा बदलण्याची (Shcool Timing) सूचना राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. याला प्रतिसाद देत सरकारने परिपत्रक काढले आहे.

(हेही वाचा – Mumbai Cement Concrete Road : दुसऱ्या टप्प्यातील ४०० किमी अंतराच्या निविदा जारी; जुन्या पारंपारिक कंत्राटदारांनी घेतली अतिरिक्त आयुक्तांची भेट)

राज्यपालांच्या सूचनेला राज्यातील पालक, शिक्षक आणि अभ्यासक अशा सर्वांनीच पाठिंबा दिला होता. राज्यात बहुतांश शाळा सकाळी ७ वाजताच्या आसपास भरतात. त्यामुळे लहान वयात मुलांची झोप पूर्ण होत नाही. ही वेळ नऊपर्यंत पुढे नेल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन शिकण्यात लक्ष लागेल, अशी राज्यपालांची भूमिका होती. यासोबत पालकांची सकाळी पाच वाजल्यापासून होणारी धावपळ कमी होईल, अशी भूमिका पालकांकडून मांडण्यात येत होती. याला राज्याच्या शिक्षक विभागाने प्रतिसाद दिला आहे.

चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलली

या परिपत्रकामुळे राज्यातल्या चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलणार आहे. सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा आता सकाळी 9 वाजता भरणार आहेत. सर्व माध्यमांच्या, तसेच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजल्यानंतर भरवण्याचे परिपत्रक ८ फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने काढले.

पालकांनी कळवले अभिप्राय

राज्यपालांच्या सूचनेनंतर राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण प्रेमी, पालक, तसंच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदविण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. या माध्यमातून पालकांनी अभिप्राय नोंदवले होते.

(हेही वाचा – UPA vs NDA : लोकसभेत युपीए सरकारची श्वेतपत्रिका सादर; कॉंग्रेसमध्ये खळबळ)

शारीरिक व मानसिक आरोग्यावर होते परिणाम

सध्याची बदललेली जीवनशैली (modern lifestyle), मनोरंजनाची विविध साधने, शहरातील उशिरापर्यंत सुरु असलेले ध्वनीप्रदूषण, उदा, वाहनांचा आवाज, विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजविले जाणारे कर्कश संगीत इ. अशा अनेकविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत. सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे, असा सूर पालकांच्या अभिप्रायांतून व्यक्त झाला होता. (school timings in maharashtra)

पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात. मोसमी हवामान, विशेषतः हिवाळा आणि पावसाळा या ऋतू मध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे. पावसामुळे आणि थंडी मुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो, ते बहुदा आजारी पडतात.

यांसारख्या घटकांचा विचार करून राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळा ९ वाजता किंवा त्यानंतर भरवण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. ज्या शाळांची पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी 9 वाजण्याच्या अगोदरची आहे, त्या शाळांना आता त्यांच्या वेळांत बदल करावे लागणार आहेत. (Maharashtra School)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.