CSMT Taps Stolen : सीएसएमटी वातानुकूलित शौचालयातून नळाची चोरी; तिघांना अटक

आरपीएफच्या जवानांनी या चोरीचा छडा लावून तीन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये चोरीच्या वस्तू विकत घेणाऱ्या दोन जणांचा समावेश आहे. ४ जानेवारी रोजीच हे वातानुकूलित शौचालय प्रवासासाठी खुले करण्यात आले होते, परंतु चोरीच्या घटनांमुळे महिन्याभरातच हे शौचालय बंद करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली.

156
CSMT Taps Stolen : सीएसएमटी वातानुकूलित शौचालयातून नळाची चोरी; तिघांना अटक

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी (CSMT) रेल्वे टर्मिनस या ठिकाणी नव्याने सुरू करण्यात आलेल्या वातानुकूलित शौचालयातून नळ आणि इतर साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) यश आले आहे. आरपीएफच्या (RPF) जवानांनी या चोरीचा छडा लावून तीन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये चोरीच्या वस्तू विकत घेणाऱ्या दोन जणांचा समावेश आहे. ४ जानेवारी रोजीच हे वातानुकूलित शौचालय (air-conditioned toilet) प्रवासासाठी खुले करण्यात आले होते, परंतु चोरीच्या घटनांमुळे महिन्याभरातच हे शौचालय बंद करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली. (CSMT Taps Stolen)

मोहम्मद ओवेस (२४), राहुल रोशनलाल जैन (२०) आणि पियुष गणेशलाल जैन (२०) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. मोहम्मद ओवेस हा याला चोरी प्रकरणी तर राहुल जैन आणि पियुष जैन यांना चोरीच्या वस्तू विकत घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मोहम्मद ओवेस मूळचा रांची (झारखंड) येथे राहणारा असून तो नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता, व सध्या सायन कोळीवाड्यात राहत होता. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस (CSMT) या ठिकाणी रेल्वे प्रवाश्यासाठी वातानुकूलित अत्याधुनिक शौचालय (air-conditioned toilet) बांधण्यात आले होते. या शौचालय स्टीलचे महागडे नळ, तसेच जेट स्प्रे, पिलर टॅप आणि बिब कॉक्स बसविण्यात आले होते.४ जानेवारी हे शौचालय प्रवाशासाठी खुले करण्यात आले होते. हे शौचालय सुरू होऊन महिना उलटत नाही तोच शौचालयातील स्टीलचे नळ, जेट स्प्रे, पिलर टॅप आणि बिब कॉक्स चोरीला गेले होते. चोरट्यांनी या वस्तू चोरी करण्यासाठी शौचालयातील भांड्यांचे आणि बेसिनचे नुकसान केले होते. (CSMT Taps Stolen)

(हेही वाचा – Mumbai Cement Concrete Road : दुसऱ्या टप्प्यातील ४०० किमी अंतराच्या निविदा जारी; जुन्या पारंपारिक कंत्राटदारांनी घेतली अतिरिक्त आयुक्तांची भेट)

चोरीचे १५ हजाराचे साहित्य जप्त

६ फेब्रुवारी रोजी याप्रकरणी वरिष्ठ विभाग अभियंत्याने हरवल्याची तक्रार नोंदवली होती. ७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास चोरट्याने पुन्हा शौचालयातील (air-conditioned toilet) नळे चोरण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याच्या मागावर असलेल्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या महिला जवानांनी या चोरट्याला चोरी करताना मुद्देमालासह अटक केली. मोहम्मद ओवेस असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने चोरी केलेले नळे व इतर साहित्य त्याने पियुष जैन आणि राहुल जैन या दुकानदाराला स्वस्त भावात विकल्याची कबुली दिली. आरपीएफने पियुष आणि राहुल जैन या दोघांना अटक करून चोरीचे १५ हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. महिनाभरापूर्वीच खुले करण्यात आलेले वातानुकूलित शौचालय (air-conditioned toilet) चोरीच्या घटनेनंतर महिन्याभरात रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात आले आहे. दुरुस्तीच्या नावाखाली हे वातानुकूलित शौचालय रेल्वे प्रशासनाने काही काळाकरिता बंद करण्यात आले असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (CSMT Taps Stolen)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.