Maharashtra Rain: जिल्ह्यात परतीचा तडाखा! ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

111
Maharashtra Rain: जिल्ह्यात परतीचा तडाखा! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain: जिल्ह्यात परतीचा तडाखा! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबई- पुण्यासह महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना परतीच्या पावसाने (Maharashtra Rain) चांगलेच झोडपून काढले आहे. मराठवाड्यात पावसाचा जोर कायम असून, गुरुवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. एकूण २६ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. जायकवाडी धरण भरल्यामुळे १८ दरवाजे अडीच फुटांने उघडून विसर्ग करण्यात आला आहे. मराठवाड्यात मुसळधार पावसाने शेतीला तडाखा दिला आहे.

नाशिकमध्ये गंगापूर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने गोदापात्रातील पाणीपातळी वाढली आहे. परतीच्या पावसामुळे जळगावात खरीप हंगामातील कापूस व सोयाबीनच्या पिकांना फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे. खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे. खबरदारीचे उपाय म्हणून एनडीआरएफच्या १८ आणि एसडीआरएफच्या सहा तुकड्या तैनात आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. (Maharashtra Rain)

‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Rain)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.