Heavy Rain : मुंबई, पुण्यासह ‘या’ ५ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

69

राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाल्यामुळे शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. तर काही ठिकाणी मात्र अद्यापही पावसाची अपेक्षा कायम आहे. अशात सोमवार, १८ सप्टेंबर रोजी हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे आणि मुंबईसह आणखी ५ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाल्याची माहिती आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. तर राज्यातल्या इतर जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट असणार आहे. इतकेच नाहीतर कोकणात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मध्य भारतात कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल, असा अंदाज आहे. सोमवारी कोकण आणि घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

(हेही वाचा Supreme Court : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवर काय म्हणाले राहुल नार्वेकर?)

खरंतर, आठवड्याभरापासून पाऊस सुट्टीवर होता. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने राज्यात बरसण्यास सुरुवात केली. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पहाटेपासूनच हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. तर दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. गौरी-गणपतीच्या पार्श्वभूमीवर शहराला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावे तर शेतकऱ्यांनीही हवामानाचा अंदाज घेत शेतीच्या कामांना सुरुवात करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.