-
प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी राज्य सरकारकडून केरळ राज्य लॉटरीचा अभ्यास केला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या समितीत सर्वपक्षीय आमदारांचा समावेश आहे. या समितीला केरळ राज्य लॉटरीचा अभ्यास करून एक महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. (Maharashtra Lottery)
(हेही वाचा – Gutkha Seized: गुटखा वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले; कर्नाटकात २.६० कोटींच्या मुद्देमालसह ११ ट्रक जप्त )
गेल्या महिन्यात पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या माध्यमातून राज्याच्या महसुलात वाढ करण्याबाबत सूचना केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राज्य लॉटरी संचालनालयाने सोमवारी या समितीबाबतचा शासन निर्णय जारी केला. (Maharashtra Lottery)
(हेही वाचा – वक्फ बोर्डाने गरिबांसाठी एकतरी शाळा उघडली आहे का ?; बिहारचे राज्यपाल Arif Mohammad Khan यांचा सवाल)
या समितीत भाजपाचे आमदार अमित साटम, शिवसेनेचे चंद्रदीप नरके, विठ्ठल लंघे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चेतन तुपे, शेखर निकम, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पाटील, शिवसेना उबाठाचे सुनील प्रभू, काँग्रेसचे अमित देशमुख यांचा समावेश आहे. राज्य लॉटरीच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार हे या समितीच्या सदस्य सचिव आहेत. ही समिती केरळचा दौरा करून केरळ राज्य लॉटरीचा अभ्यास करणार आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या उत्पन्नात वाढ करण्याबाबत राज्य सरकारला उपाययोजना सुचविणार आहे. (Maharashtra Lottery)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community