Maharashtra Bhushan Award : त्या कार्यक्रमासाठी मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून केला ‘हा’ खर्च

राज्य सरकारच्यावतीने यंदाचा महाराष्ट्र भुषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहिर करण्यात आल्यानंतर या पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम १६ एप्रिल २०२३ रोजी नवी मुंबई खारघर येथील मैदानावर घेण्यात आला होता. या कार्यक्रमाला गालबोट लागून उष्माघातामुळे उपस्थित साधकांपैंकी १४ साधकांचा मृत्यू झाला होता.

1103
Maharashtra Bhushan Award : त्या कार्यक्रमासाठी मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून केला 'हा' खर्च
Maharashtra Bhushan Award : त्या कार्यक्रमासाठी मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून केला 'हा' खर्च

राज्य सरकारच्या (State Govt) वतीने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भुषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्याचा नवी मुंबई (Navi Mumbai) खारघर (Kharghar) येथील कार्यक्रमासाठी सरकारच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च केले असले तरी मुंबई महापालिकेवरही या कार्यक्रमाचा बोजा टाकण्यात होता. या कार्यक्रमासाठी महापालिकेच्यावतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, या जेवणासाठी महापालिकेने २३ लाख ३१ हजार रुपयांचा खर्च केला आहे. एवढेच नाही याठिकाणी जमलेल्या सर्व साधकांसाठी १२०० फिरत्या शौचालयांचीही व्यवस्था महापालिकेने केली होती. या दोन्हींचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. (Maharashtra Bhushan Award)

राज्य सरकारच्यावतीने यंदाचा महाराष्ट्र भुषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहिर करण्यात आल्यानंतर या पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम १६ एप्रिल २०२३ रोजी नवी मुंबई खारघर येथील मैदानावर घेण्यात आला होता. या कार्यक्रमाला गालबोट लागून उष्माघातामुळे उपस्थित साधकांपैंकी १४ साधकांचा मृत्यू झाला होता. रणरणत्या उन्हात बसलेल्या साधकांना वेळेवर पाणी व खाण्यास काहीच उपलब्ध न अनेक जण चक्कर येवून पडले होते. (Maharashtra Bhushan Award)

जेवणाच्या पुरवठ्यासाठी इतका खर्च

मात्र, याच कार्यक्रमासाठी सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात यासाठी महापालिकेच्या तिजोरतील पैसा वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमासाठी जेवणाची व्यवस्था मुंबई महापालिकेला करण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिले होते, त्यानुसार महापालिकेच्यावतीने तातडीने जेवणाची व्यवस्था करून दिली होती. या जेवणाच्या पुरवठ्यासाठी २३ लाख ३१ हजार रुपये खर्च केले गेले आणि हे काम महापालिकेने स्वस्तिक महिला फाऊंडेशन यांच्याकडून महापालिकेच्या टी विभागाने करून घेतले होते. (Maharashtra Bhushan Award)

(हेही वाचा – Ind vs Afg T20 Series : रोहित आणि विराटची संघात येण्यामागे काय आहे नेमके कारण जाणून घ्या)

१२०० शौचालयांची सुविधा

महापालिका प्रशासनाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र भुषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सन २०२२च्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाकरता जेवणाचे नियोजन तथा पूर्व तयारी करण्याच्या सूचना उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिले होते. या सूचना लक्षात घेऊन महापालिकेने जेवणाची व्यवस्था त्या कार्यक्रमाकरता केली होती. विशेष म्हणजे यासाठी लागणाऱ्या फिरत्या शौचालयांची सुविधाही महापालिकेच्यावतीने त्याठिकाणी करण्यात आली. खासगी कंपनीच्यावतीने या १२०० शौचालयांची सुविधा तिथे पुरवले, त्यासाठीचा आलेला सुमारे ७२ लाख रुपयांचा खर्चही महापालिकेच्या तिजोरीतूनच भागवण्यात आला आहे. (Maharashtra Bhushan Award)

याबाबत मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रतिक्रिया देताना, महापालिकेचा निधी कुठे आणि कसा खर्च केला जावा हे अधिनियमात स्पष्ट आहे. मुंबईच्या बाहेर सरकारच्या एका कार्यक्रमासाठी पैसा खर्च केला जावू शकत नाही. इथे जेवणाचा आणि फिरत्या शौचालयांचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून भागवला असेल तर ही अत्यंत चुकीची बाब आहे. हा कार्यक्रम जर नवी मुंबईच्या हद्दीत झाला होता, तर त्या महापालिकेच्या निधीतून हा खर्च करायला हवा होता, किंवा जर त्यांची क्षमता नसेल तर त्या पुरवण्यात आलेल्या सेवेचा खर्च सरकारने मुंबई महापालिकेला द्यायला हवा. जेवण आणि फिरत्या शौचालयासाठी सुमारे १ कोटींचा खर्च झाला असून हा निधी जर महापालिकेने खर्च केला असेल हा खर्च करण्यास परवानगी देणारे आयुक्त तथा प्रशासक हे दोषी आहेत. आयुक्तांना अजुन कुठली डॉक्टरेट हवी आहे म्हणून ते सरकारसाठी नियमबाह्य काम करत आहेत, असा सवालही राजा यांनी केला आहे. (Maharashtra Bhushan Award)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.