Mhada old buildings : म्हाडातर्फे मास्टर लिस्टवरील पात्र अर्जदारांची २८ डिसेंबरला संगणकीय सोडत

येत्या २८ डिसेंबर रोजी काढण्यात येणार्‍या संगणकीय सोडतीसाठी एकूण ४०० सदनिका उपलब्ध असून बृहतसूचीवरून पात्र अर्जदारांची संख्या २६५  आहे.

5036
Mhada old buildings : म्हाडातर्फे मास्टर लिस्टवरील पात्र अर्जदारांची २८ डिसेंबरला संगणकीय सोडत
Mhada old buildings : म्हाडातर्फे मास्टर लिस्टवरील पात्र अर्जदारांची २८ डिसेंबरला संगणकीय सोडत
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील बृहतसूचीवरील  अर्थात मास्टर लिस्ट वरील जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील भाडेकरू-रहिवाशी यांना सदनिकांचे वितरण करण्यासाठी येत्या २८ डिसेंबर, २०२३ रोजी दुपारी एक वाजता वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे, अशी घोषणा म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी केली. या ऐतिहासिक निर्णयामुळे बृहतसूचीवरील सदनिका वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक, गतिमान होणार असून सदनिका वितरणाच्या प्रक्रियेत सुसूत्रता येणार असून भाडेकरूतथा रहिवाशी यांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणार असल्याचे  जयस्वाल यांनी स्पष्ट केले.(Mhada old buildings)
सदनिका वितरणाचे यापूर्वीचे आदेश, ठराव रद्द..
जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील पात्र भाडेकरू ,(रहिवाशी) यांना बृहतसूचीवरून सदनिका वितरण करण्यासाठीची नियमावली निश्चित करण्यात आली असून त्यासंदर्भातील परिपत्रक गुरुवारी जारी करण्यात आले. बृहतसूचीवरून भाडेकरू, (रहिवाशी) यांना सदनिका वितरणाच्या धोरणाचा भाग म्हणून यापूर्वीचे प्राधिकरणाचे ठराव, परिपत्रके, आदेश रद्द, अधिक्रमित, सुधारित करून त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन नियमावलीनुसार निवासी गाळा वितरणाची मर्यादा निश्चित करण्यात आली असून निवासी गाळ्यांचे वितरण संगणकीय प्रणालीने करण्याचा निर्णय घेऊन त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जात असल्याचे संजीव जयस्वाल यांनी सांगितले.(Mhada old buildings)
कुठल्या भाडेकरूचा होतो मास्टर लिस्ट वर समावेश
मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकरप्राप्त इमारतीमधील ज्या भाडेकरू/ रहिवाशी यांना तोडक करवाईत (व्हेकेशन नोटीस) देऊन इमारत खाली करण्यात आली आहे व त्यांच्या मूळ इमारतीचा अरुंद भूखंड, आरक्षण, रस्ता रुंदीकरण या कारणामुळे पुनर्विकास शक्य नाही. तसेच उपकरप्राप्त इमारती पुनर्रचित झाल्या आहेत, मात्र कमी गाळे बांधले गेले आहेत अशा वंचित मूळ भाडेकरू/ रहिवाशी यांना यापूर्वी मंडळाद्वारे पुनर्रचित / पुनर्विकसित इमारतीमध्ये कायमस्वरूपी गाळा देण्यात आलेला नाही व त्यांचे वारसदार संक्रमण शिबिरात किंवा इतर ठिकाणी राहत आहेत अशा बृहतसूचीवरील पात्र मूळ भाडेकरू / रहिवाशी अथवा त्यांचे वारसदार यांची संगणकीय सोडत काढण्यात येणार असल्याचे  जयस्वाल यांनी सांगितले.(Mhada old buildings)
पात्र अर्जदारांची संख्या २६५
येत्या २८ डिसेंबर रोजी काढण्यात येणार्‍या संगणकीय सोडतीसाठी एकूण ४०० सदनिका उपलब्ध असून बृहतसूचीवरून पात्र अर्जदारांची संख्या २६५  आहे.  मास्टर  लिस्ट वरील पात्र अर्जदारांना सदनिका वितरित करण्यासाठी निकष ठरविण्यात आले असून ३०० चौरस फूटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या जुन्या सदनिकाधारकाला ३०० ते ४०० चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका वितरित केली जाणार आहे.(Mhada old buildings)
तर एवढ्या क्षेत्रफळाची मिळणार सदनिका..
३०१ ते ४०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या जुन्या सदनिकाधारकाला ४०० ते ५०० चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका वितरित केली जाणार आहे. ४०१ ते ५०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या जुन्या सदनिकाधारकाला ५०० ते ६०० चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका वितरित केली जाणार आहे. ५०१ ते ६०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या जुन्या सदनिकाधारकाला ६०० ते ७०० चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका वितरित केली जाणार आहे. ६०१ ते ७०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या जुन्या सदनिकाधारकाला ७०० ते ७५३ चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका वितरित केली जाणार आहे. तसेच ७०१ व त्यावरील जुन्या सदनिकाधारकाला ७५३ चौरस फूट क्षेत्रफळापर्यंत  सदनिका वितरित केली जाणार आहे.(Mhada old buildings)
मोठे घर हवे असल्यास एवढी रक्कम मोजावी लागेल…
गाळे वाटपाच्या धोरणात बदल करण्यात आला असून नवीन धोरणानुसार मूळ गाळ्याच्या क्षेत्रफळापेक्षा अतिरिक्त क्षेत्रफळाचा गाळा लाभार्थ्यांना देण्याची तरतूद आहे. मूळ गाळा निशुल्क असून अतिरिक्त क्षेत्रफळाकरिता चालू आर्थिक वर्षाच्या रेडिरेकनर दराच्या १२५ टक्के दराने अधिमूल्याची आकारणी करून वितरित करण्यात येणार असल्याचे  जयस्वाल यांनी सांगितले.(Mhada old buildings)
तर सदनिकेच्या वितरण होणार रद्द
अर्जदाराने देकारपत्र प्राप्त झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत देकारपत्रातील नमूद अटी व शर्तींची पूर्तता करून ताबा घेणे बंधनकारक असून तसे न केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता सदनिकेचे वितरण रद्द होणार असून बृहतसूचीवरील हक्क संपुष्टात येणार असल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.(Mhada old buildings)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.