Gas Cylinder Booking: 1 हजार रूपयांपेक्षा स्वस्त मिळणार LPG गॅस सिलिंडर?

109

तुमचा गॅस सिलिंडर बुक करायचा बाकी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे गृहिणींचा बजेट कोलमडला होता. मात्र आता गृहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्हाला 1000 रुपयांपेक्षा स्वस्त एलपीजी सिलिंडर मिळत असून तुम्ही घरी बसून गॅस बुकिंग करू शकता. सरकारी तेल कंपन्यांनी याबाबत माहिती दिली आहे. 1000 रुपयांत स्वस्तात गॅस सिलिंडर कसा बुक करता येणार हे तुम्हाला माहित आहे का….जाणून घ्या…

असे करा गॅस सिलिंडर बुकिंग

सरकारी तेल कंपन्यांच्या कस्टमर केअरला फोन करून तुम्ही तुमचा सिलिंडर (LPG Cylinder Booking) बुक करू शकता. याशिवाय तुम्ही ऑनलाइन Paytm द्वारे सिलेंडर बुक करू शकता. तुमच्याकडे पेटीएम अॅप असल्यास, तुम्ही त्याद्वारे स्वस्तात गॅस सिलिंडर बुक करू शकता. पेटीएमद्वारे सिलिंडर बुक करून तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो आणि गॅस सिलिंडर बुक केल्यावर तुम्हाला 1000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो.

(हेही वाचा – Indian Railway: रेल्वे प्रवाशांनो तिकीटांचे दर वाढणार? संसदेत रेल्वेमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले…)

हे ऑनलाईन सिलिंडर बुक करताना तुम्हाला पेटीएमवर 4 कॅशबॅक ऑफरचा फायदा मिळू शकतो. यामध्ये तुम्हाला 5 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. तसेच तुम्ही पेटीएममधील प्रोमो कोड GAS1000 वापरू शकता. यामध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त 1000 रुपये आणि किमान 5 रुपये कॅशबॅक दिला जातो.

असे करा बुकिंग

  1. सर्वप्रथम तुम्हाला पेटीएम अॅपवर जाऊन Book gas Cylinder च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  2. यानंतर गॅस प्रोव्हायडरची निवड करून तुम्हाला भरतगॅस, एचपी गॅस, इंडेन तुमचा कोणताही प्रोव्हायडर निवडावा लागेल.
  3. यानंतर तुम्हाला एलपीजी आयडी किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.
  4. आता तुम्हाला Proceed च्या पर्यायावर क्लिक करून Apply Promocode वर क्लिक करावे लागेल. येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऑफर्सचा लाभ घेऊ शकता.
  5. प्रोमोकोड टाकल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागेल आणि कॅशबॅक मिळेल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.