ठाकरे कुटुंबियांचे अलिबागमधील १९ बंगले कुठे गेले?; किरीट सोमय्यांचा सवाल

86

उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांचे अलिबागमधील १९ बंगले कुठे गेले? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी ४८ तासांत या प्रकरणी चौकशी अहवाल पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

सोमय्या म्हणाले, मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी घेतलेल्या जागेवर १९ बंगले होते. त्यामध्ये घोटाळा झाला असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही मान्य केले आहे. हे बंगले रश्मी ठाकरे यांच्याशी संबंधित अन्वय नाईक यांनी २००९ मध्ये बांधले. २०१४ मध्ये ठाकरे कुटुंबीयांनी ते विकतही घेतले, त्यानंतर हे बंगले रश्मी ठाकरे यांच्या नावावर झाले.

(हेही वाचा भारतीय सैन्यही चीनमध्ये घुसखोरी करते; भालचंद्र नेमाडे यांचे बेताल वक्तव्य)

२०२० मध्ये त्यांनी १९ बंगल्यांचा मालमत्ता करही भरला आहे. रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी हा कर भरला आहे. इतकेच नाही तर त्यापूर्वीची दोन वर्षे रश्मी ठाकरे यांनी आणि त्याआधी सहा वर्षांचा मालमत्ता कर अन्वय नाईक यांनी भरला आहे. मात्र, आता हे बंगले गायब आहेत. हे बंगले एका रात्रीत कुणी तोडले? कुणी चोरले? तसेच याबाबतचा आदेश कुठल्या अधिकाऱ्याने दिला? बंगले तोडण्याची परवानगी घेतली होती काय? या सगळ्याचा तपास होणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली.

किशोरी पेडणेकर यांची हातसफाई

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी २०१७ मध्ये शपथपत्रात वरळी येथील गोमातानगरमधील पत्ता दिला आहे. त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत गोमाता जनता एसआरए सह. गृह. संस्था वरळीतील सदनिका आणि गाळ्यामध्ये बेकायदेशीर घुसखोरी केल्याचे सिद्ध झाले आहे. एसारएकडून चौकशीनंतर हे गाळे ४८ तासांत खाली करण्याचे आदेश मुंबई महापालिकेकडून देण्यात आले आहेत. मुंबईतील गरीब झोपडपट्टीवासियांच्या सदनिका महापौर किशोरी पेडणेकर यांनी ढापल्या आहेत असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.

अनिल परब विरोधात लढाई सुरू राहील

पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून दापोलीत साई रिसॉर्ट उभारल्याप्रकरणी शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची सुनावणी बुधवारी झाली. त्याला अनिल परब आणि सदानंद कदम गैरहजर राहिले. त्यांचा पंधरा हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. याप्रकरणी पुढेही जोमाने लढाई सुरू राहील असेही सोमय्या म्हणाले.

(हेही वाचा सुषमा अंधारेंची तत्काळ पक्षातून हकालपट्टी करा; वारक-यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.