Love Jihad : दोन हिंदू बहिणींना मुस्लिम तरुणांनी अडकवले प्रेमाच्या जाळ्यात; आई-वडिलांनी विरोध करताच तरुणींंनी उचलले ‘हे’ पाऊल

तिरुचिरापल्ली पोलिसांच्या मते, 21 वर्षांची विद्या आणि 23 वर्षांची गायत्री या दोघींचे मृतदेह वलनाडू गावात विहिरीत सापडले.

133

तामिळनाडूमधील तिरुचिरापल्लीमध्ये मुस्लिम मुलांशी लग्न करण्यास पालकांनी नकार दिल्याने दोन सख्या बहिणींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघी बहिणींना दोन मुस्लिम मुलांशी लग्न करण्याची इच्छा होती. ते दोघेही सख्खे भाऊच होते. परंतू आई वडीलांना आपल्या मुलींनी मुस्लिम मुलांशी लग्न करु नये, असे वाटत होते.

तिरुचिरापल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 वर्षांची विद्या आणि 23 वर्षांची गायत्री या दोघींचे मृतदेह वलनाडू गावात विहिरीत सापडले. हे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीसांचे म्हणणे आहे की, ते सगळ्या शक्यता पडताळून त्या पद्धतीने तपास करत आहेत.

(हेही वाचा Mira Road Murder : माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर : लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये केले बारिक)

विद्या आणि गायत्रीचे वडील पिचाई आणि आई अखिलंडेश्वरी हे रोजंदारी मजूर आहेत. मृत दोन बहिणी कोईम्बतूरजवळील कांगेयम येथे कापड गिरणीत काम करत होत्या. त्याच ठिकाणी ते दोन मुस्लिम भाऊही काम करत होते. काही वर्षांपूर्वी त्या दोन बहिणींची त्या दोन मुलांसोबत मैत्री झाली, त्याच मैत्रीचे पुढे प्रेमात रुपांतर झाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.