कोल्हापुरात लव्ह जिहाद! वातावरण तणावग्रस्त, हिंदुत्वादी संघटना उतरल्या रस्त्यावर

100

कोल्हापुरात इयत्ता नववीमध्ये शिकणारी मुलगी 17 ऑक्टोबरपासून बेपत्ता आहे. दिवाळीपूर्वी परीक्षेची पेपर द्यायला गेलेली मुलगी परतली नसल्यामुळे नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार केली. 17 दिवस उलटूनही मुलीचा अद्याप शोध लागला नाही. मुस्लिम युवकाने या मुलीला पळवल्याचा संशय आहे. दरम्यान मुस्लिम युवकही बेपत्ता असल्याने हा संशय बळावला आहे. लव्ह जिहादसाठीच मुलीला पळवल्याचा आरोप होत आहे. मुलीचा आणि युवकाचा शोध लागत नसल्यामुळे पोलिसांविरोधात हिंदुत्ववादी संघटना संतापल्या असून ते रस्त्यावर उतरले आहेत.

आमदार नितेश राणे आंदोलनात सहभागी

कोल्हापुरात लव जिहादच्या विषयावरून वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील शाळकरी मुलगी जर परत आली नाही तर तांडव करू, असा इशारा यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला. तसेच धर्मांतर बंदीचा कायदाही येत्या अधिवेशनात आणणार असल्याची माहिती राणेंनी दिली. या प्रकरणावरून कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात आमदार नितेश राणे हेही सहभागी झाले आहेत. राज्यात लव्ह जिहादची प्रकरणे खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पोलिसांच्या तपासावर त्यांनी नाराजी व्यक्त करत पोलिसांवर कारवाईची मागणी केली. 17 दिवस उलटूनही मुलीला शोधण्यास पोलिसांना आलेले अपयश या सगळ्याला कारणीभूत आहे, त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

(हेही वाचा अशोक गेहलोत गुलाम नबी आझादांच्या मार्गावर, काँग्रेसला करणार रामराम?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.