Love Jihad : भांडूपमधील अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या जिहादी तरुणावर पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई करावी – डॉ.प्रतिभा बोथारे

५ दिवस या मुलीची छेडछाड करण्यात आली, शारीरिक खेळ करण्यात आला, असा आरोप पीडितांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

147
Love Jihad : भांडूपमधील अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या जिहादी तरुणावर पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई करावी - डॉ.प्रतिभा बोथारे

भांडूपच्या खिंडीपाडा वस्तीतील किसनलाल बडेला यांची अल्पवयीन मुलगी लव्ह जिहादची (Love Jihad) शिकार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीसांनी आरोपी मुस्लिम तरुणाला अटक केली आहे.पण आरोपीला या कटात मदत करणारे त्याचे आईवडील आणि नातेवाईकांवरसुद्धा पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद, मातृशक्ति संयोजिका डॉ. प्रतिभा बोथारे यांनी केली आहे.

आज देशभरात लव्हजिहादच्या (Love Jihad) केसेस वाढत आहेत.. काही राजकीय मंडळीच्या प्रोत्साहनाने जिहादींचा उन्माद वाढला आहे. वसईच्या श्रद्धा वालकर आणि चेंबूरच्या रुपाली चंदनशीवेच्या घटना ताज्या आहेत. अशावेळी शासनाने सक्रिय भूमिका घेत लव्हजिहाद विरोधी कायदा तात्काळ करावा अशी मागणी बोथारे यांनी केली आहे.

(हेही वाचा – Love Jihad : ‘लव्ह जिहाद’ वर त्वरित कायदा करा – किरीट सोमय्या)

२६ मे शुक्रवारी महाराष्ट्रातील सर्व पोलीस उपायुक्तांना मातृशक्तिच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. तसेच शासन प्रशासनाने कारवाई बाबत ढिलाई केल्यास मातृशक्ति रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी आपल्या पत्रात दिला आहे.

पॉक्सो कायदा म्हणजे नक्की काय?

पॉक्सो कायदा हा बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने २०१२ साली तयार केलेला कायदा आहे. पोक्सो हे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्च्युअल ओफेन्सेसचे लघुरूप आहे.

हेही पहा – 

असा घडला लव्ह जिहादचा प्रकार

भांडुप मधील १३ वर्षांच्या हिंदू मुलीचे सैफ खान आणि मोहम्मद यांनी अपहरण केले. १३ वर्ष ८ महिन्यांची आपली मुलगी सापडत नाही अशा प्रकारची तक्रार बडेला यांनी ८ मे रोजी केली होती. पीडित (Love Jihad) मुलीच्या घराजवळ हेअर कटिंग सलूनमध्ये काम करणारे सैफ खान आणि त्याचा साथीदार मोहम्मद यांनी या मुलीला फसवले असल्याचे तपासादरम्यान समोर आले. या मुलीला फसवून तिला जबरदस्तीने आझमगडला नेण्यात आले, आझमगडच्या एका छोट्याशा गावात बंद खोलीत तिला कोंडून ठेवण्यात आले. मुलीचा मोबाईल ही तिच्याकडून काढून घेतला. ५ दिवस या मुलीची छेडछाड करण्यात आली, शारीरिक खेळ करण्यात आला, असा आरोप पीडितांच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुलीने दुसऱ्या कोणाच्या मोबाईल वरून आपल्या वडिलांना कळविले की तिला कुठे तरी कोंडून ठेवण्यात आले आहे. या फोन कॉलचा पाठपुरावा, कॉल ट्रेस करताना मुंबई पोलीस आझमगड येथे पोहचले. त्यानंतर ५ दिवसांनी या मुलीला ताब्यात घेण्यात आले आणि मुंबईत आणण्यात आले. त्यामुळे राज्य सरकारने त्वरित लव्ह जिहाद (Love Jihad) वर कायदा करावा, अशी मागणी भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.