Republic Day 2024 : २६ जानेवारीच्या परेडमध्ये दिसणार भगवान रामलला

इस्रोचा चित्ररथ चांद्रयान-३ ची कथा दर्शविणारा आहे. ही भारतीय अवकाशाच्या इतिहासातील कथा आहे. छत्तीसगडची झांकी आदिवासी समाजात प्राचीन काळापासून असलेली लोकशाहीची चेतना आणि परंपरेची ओळख करून देणारी असेल. ही परंपरा स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही राज्याच्या बस्तर विभागात जिवंत आणि प्रचलित आहे.

131
Ram Mandir: रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी नवीन व्यवस्था लागू, काय आहेत नवीन नियम? वाचा सविस्तर...
Ram Mandir: रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी नवीन व्यवस्था लागू, काय आहेत नवीन नियम? वाचा सविस्तर...
  • वंदना बर्वे

अयोध्येतील राम मंदिरात रामललाची स्थापना झाल्यामुळे संपूर्ण विश्वात आनंदाची लाट पसरली आहे. आत संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे ते २६ जानेवारी रोजी दिल्लीच्या कर्तव्यपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) परेडकडे. मंगळवारी, (२३ जानेवारी) झालेल्या फुल ड्रेस रिहर्सलमधील उत्तरप्रदेशच्या चित्ररथाची सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे. यंदाच्या परेडमध्ये आर्मी डॉक्टरांसोबत आर्मी हेल्थ वर्कर्सचाही सहभाग राहणार आहे. याशिवाय दिल्ली पोलिसांच्या महिला शिपाई देखील प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) परेडमध्ये भाग घेणार आहेत. (Republic Day 2024)

अयोध्येतील रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधल्यानंतर आता प्रजासत्ताक दिनाचा (Republic Day) सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. प्रजासत्ताक दिनी (Republic Day) कर्तव्यपथावर होणाऱ्या परेडची मंगळवारी फुल ड्रेस रिहर्सल झाली. यात पहिल्यांदाच १५०० महिलांनी एकत्र लोकनृत्य सादर केले. महत्वाचे म्हणजे, यावेळ परेडामधील उत्तरप्रदेशच्या चित्ररथात भगवान रामललाचे दर्शन होणार आहे. प्रभू श्रीरामचंद्राच्या बालरूपाचा यूपीच्या झांकीमध्ये समावेश करण्यात आला आहे. यानंतरचे चित्ररथ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळ नोएडा विमानतळाचे आहे. ट्रॅक्टरवर साधूंजनांच्यानंतर रॅपिड रेल्वे तयार करण्यात आली आहे. त्यामागे ब्रह्मोस क्षेपणास्त्र दाखवले आहे. (Republic Day 2024)

(हेही वाचा – Ayodhya Shri Ram Mandir : अयोध्या – आधुनिक भारताचा चैतन्य स्रोत)

या चित्ररथांचा असणार सहभाग 

चित्ररथाच्यामागील एलईडी स्क्रीन एक्स्प्रेसवेच्या माध्यमातून सहा कार्यान्वित आणि सात निर्माणाधील एक्स्प्रेस वे दाखविण्यात आले आहेत. या झांकीमध्ये कलशासोबत दोन साधुंना दाखविण्यात आले आहे. हे २०२५ मध्ये प्रयागराज येथे होणाऱ्या माघ मेळ्याचे महाकुंभाचे प्रतीक आहे. हरियाणा राज्याच्या चित्ररथाबाबत सांगायचे झाले तर कौटुंबिक ओळखपत्राचे महत्व विषद करण्यात आले आहे. मध्य प्रदेशचा चित्ररथ स्वावलंबी भारत आणि प्रगतीशील महिला शक्तीवर केंद्रित आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या चित्ररथात जी-२० ची झलक दिसेल. (Republic Day 2024)

इस्रोचा चित्ररथ चांद्रयान-३ ची कथा दर्शविणारा आहे. ही भारतीय अवकाशाच्या इतिहासातील कथा आहे. छत्तीसगडची झांकी आदिवासी समाजात प्राचीन काळापासून असलेली लोकशाहीची चेतना आणि परंपरेची ओळख करून देणारी असेल. ही परंपरा स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही राज्याच्या बस्तर विभागात जिवंत आणि प्रचलित आहे. हा चित्ररथ देशातील लोकशाहीच्या जन्माची आणि विकासाची गाथा पुराव्यासह सादर करणार आहे. तुसार सिल्कचा समृद्ध वारसा झारखंडच्या चित्ररथात बघायला मिळणार आहे. संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज रुरकीवाल यांच्यानुसार तज्ज्ञ समितीने या सर्व चित्ररथांची निवड केली आहे. यावेळी पंजाब, दिल्ली आणि बंगालची झलक परेडचा भाग नाही. २६ जानेवारीच्या परेडची एकूण वेळ ९० मिनिटांची राहणार असून यात चित्ररथांना २६ मिनिटे देण्यात आली आहेत. सकाळी १०.३० वाजता परेड सुरू होईल. (Republic Day 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.