आता LIC मध्ये ९ हजार पदांसाठी भरती; कधी करू शकता अर्ज?

96
नुकतेच MPSC च्या ८,५०० हजार पदांसाठी भरतीची घोषणा झाली, आता पुन्हा एकदा मेगा भरतीची घोषणा झाली आहे. LICने तब्बल ९,३९४ पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. त्यामुळे बेरोजगारांना ही मोठी संधी आहे. निवड होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन चाचणी आणि मुलाखतीच्या प्रक्रियेतून जावे लागेल. शॉर्टलिस्ट केल्यानंतर उमेदवारांना प्री-रिक्रूटमेंट मेडिकल टेस्टच्या प्रक्रियेतून जावे लागेल.
देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी एलआयसीमध्ये मोठी भरती निघाली आहे. अप्रेंटिस डेवलपमेंट ऑफिसरची सव्वा नऊ हजार पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवार एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – 21 जानेवारी 2023 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी, शैक्षणिक पात्रतेचा तपशील भरती अधिसूचनेत दिलेला आहे.

वय मर्यादा

सर्व अर्जदार उमेदवारांची वयोमर्यादा २१ वर्षे ते ३० वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्क

या पदांसाठी अर्ज करणार्‍या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 750 रुपये भरावे लागतील, तर SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागतील.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.