Landslide : मुंबईतील ३१ दरडप्रवण क्षेत्रांत जिओ नेटिंग; घाटकोपर हनुमान टेकडीवर स्वित्झर्लंडच्या बनावटीचे साहित्य वापरून बोल्टिंगचे काम

1326
Landslide : मुंबईतील ३१ दरडप्रवण क्षेत्रांत जिओ नेटिंग; घाटकोपर हनुमान टेकडीवर स्वित्झर्लंडच्या बनावटीचे साहित्य वापरून बोल्टिंगचे काम

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दरडप्रवण क्षेत्रात दगड रोखून धरण्यासाठी जिओ नेटिंग या तंत्रज्ञानाचा वापर आता मुंबईतील ३१ दरडप्रवण क्षेत्रात करण्यात येत आहे. घाटकोपर येथे हनुमान टेकडी (आझाद नगर) परिसरात या नवीन तंत्रानुसार काम सुरू आहे. स्वित्झर्लंडच्या बनावटीचे साहित्य वापरून बोल्टिंगचे काम हनुमान टेकडी परिसरात सुरू असून महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत पहिल्यांदाच अशा जिओ नेटिंगच्या तंत्रज्ञानावर आधारित काम करण्यात येत आहे. (Landslide)

पावसाळ्यात पाण्यामुळे खाली सुटून येणारे दगड रोखण्यासाठी होतो उपयोग

स्वित्झर्लंड मटेरिअलचा वापर करत बोल्टिंगचे काम हनुमान टेकडी परिसरात सुरू करण्यात आले आहे. एकूण २५०० चौरस मीटरच्या क्षेत्रात बोल्टिंगचा वापर करत हे दरडप्रवण क्षेत्रात दगड रोखून धरण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. एकूण १६ जणांचा प्रशिक्षित चमू दोन पाळ्यांमध्ये हे काम करत आहे. माती तसेच काळा पाषाण (ब्लॕक बसाल्ट) या दरडप्रवण क्षेत्रात आहे. बोल्टिंगचा उपयोग हा पावसाळ्यात पाण्यामुळे खाली सुटून येणारे दगड रोखण्यासाठी होतो. ड्रिल करून सुमारे ८ मीटर इतके आत दगडात वापरण्यात येतात. प्रत्येक २ मीटर अंतरावर हे ड्रिलिंगचे काम करण्यात येत आहे. कॉरेक्स, डेल्टेक्स आणि ३२ इंच व्यासाचा अँकर या स्वित्झर्लंड मटेरिअलचा वापर करून बोल्टिंगचे काम करण्यात येत आहे. येत्या काही महिन्यातच हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. (Landslide)

मुंबईत दरडप्रवण क्षेत्रात पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या वापर

आझाद नगर, घाटकोपर येथील अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या व संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संरक्षक जाळी (जिओ नेटिंग) बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाची पाहणी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली. मुंबईत दरडप्रवण क्षेत्रात पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मुंबईतील संभाव्य ३१ ठिकाणी दरडप्रवण क्षेत्राची स्थिती पाहता अत्याधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर यानिमित्ताने सुरू झाला आहे. (Landslide)

(हेही वाचा – Ajit Pawar यांना मोठा धक्का; श्रीमंत रामराजे स्वगृही परतणार?)

दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई बनविण्याचे लक्ष्य

मुंबई शहरातील दरड प्रवण क्षेत्रात संरक्षक जाळ्या बसवून ही क्षेत्रे अधिक संरक्षित करणे आणि तेथील नागरिकांच्या जीविताची काळजी घेणे, हे आमचे प्राधान्य आहे. तर दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे, असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी २६ जून २०२४ रोजी केले. यावेळी स्थानिक आमदार दिलीप लांडे, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (परिमंडळ- ६) रमाकांत बिरादार, उप आयुक्त (परिमंडळ- ५) देवीदास क्षीरसागर, सहायक आयुक्त (एन विभाग) गजानन बेल्लाळे, सहाय्यक आयुक्त (एल विभाग) धनाजी हेर्लेकर आदी उपस्थित होते. (Landslide)

मुंबईकरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने एक दिलासा

मुंबईतील नागरिकांना या पद्धतीने होणाऱ्या कामामुळे नक्कीच सुरक्षिततेचा पर्याय मिळणार आहे. पावसाळ्यातही ही बोल्टिंगची कामे सुरू राहणार आहेत. मुंबईकरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने एक दिलासा देणारा पर्याय या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने उपलब्ध होणार आहे. हजारो लोकांच्या जीविताची काळजी करतानाच याठिकाणी कोणत्याही परिस्थितीत धोका निर्माण होणार नाही, यादृष्टीने सर्व उपाययोजना सुरू आहेत. (Landslide)

हजारो कुटुंबे हनुमान टेकडी परिसरात राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीविताची काळजी आम्ही घेत आहोत. दरडप्रवण क्षेत्रातील घरांबरोबरच म्हाडा, महानगरपालिका, एमआयडीसी यासह इतर शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. (Landslide)

मुख्यमंत्र्यांचा टेकडीवर प्रवास

असल्फा विलेज येथील हनुमान टेकडी हा परिसर अतिशय दाटीवाटीने गजबजलेला आहे.हजारो कुटुंबे या ठिकाणी राहत आहेत.पायथ्यापासून वर टेकडीपर्यंत जाण्यासाठी अतिशय अरुंद, निमुळता आणि थेट वरपर्यंत जाणारा असा रस्ता. थोडेसे चालले तरी धाप लागावी असा हा मार्ग. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी पायथ्यापासून चालत थेट या मार्गाने टेकडी गाठली आणि तेथील डोंगराला बसवलेल्या सेफ्टी नेटची पाहणी केली. (Landslide)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.