Ayodhya Rammandir Leakage : राममंदिरात पावसाचे पाणी कसे आले ?; श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने सांगितले सत्य

Ayodhya Rammandir Leakage : भगवान राम ज्या गर्भगृहात विराजमान आहेत, तेथे छतावरुन पाण्याचा एक थेंबही पडला नाही आणि गर्भगृहात पाणीही घुसले नाही, असा खुलासा राममंदिर न्यासाने केला आहे.

180
Ayodhya Rammandir Leakage : राममंदिरात पावसाचे पाणी कसे आले ?; श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने सांगितले सत्य
Ayodhya Rammandir Leakage : राममंदिरात पावसाचे पाणी कसे आले ?; श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने सांगितले सत्य

गेले काही दिवस माध्यमांमध्ये अयोध्येतील राममंदिराच्या नूतन वास्तूत पावसाचे पाणी गळत असल्याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांत व्हायरल होत आहेत. रामलल्ला (Ayodhya Ram Temple) विराजमान असलेल्या गाभाऱ्यातच पाणी गळत असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये पेरून राममंदिराचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे नॅरेटिव्ह सेट केले जात होते. याविषयी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्रन्यासाचे महामंत्री चंपत राय यांनीच खुलासा केला आहे. (Ayodhya Rammandir Leakage)

1. भगवान राम ज्या गर्भगृहात विराजमान आहेत, तेथे छतावरुन पाण्याचा एक थेंबही पडला नाही आणि गर्भगृहात पाणीही घुसले नाही.

(हेही वाचा – State Legislative Council Elections : विधानसभेतील सात आमदार मतदार का झाले कमी?)

2. गर्भगृहासमोर पूर्वेकडे एक मंडप आहे, ज्याला गुडमंडप म्हणतात. याच ठिकाणी मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरील (तळमजल्यापासून सुमारे 60 फूट उंच) छप्पर काम पूर्ण झाल्यानंतर घुमट जोडला जाईल आणि मंडपाचे छप्पर बंद केले जाईल. या मंडपाचे क्षेत्रफळ 35 फूट व्यासाचे आहे, जे पहिल्या मजल्यावर तात्पुरते झाकले जात आहे, तर दुसऱ्या मजल्यावर खांबाचे बांधकाम सुरू आहे.

3. रंग मंडप आणि गुडमंडपाच्या दरम्यान दोन्ही बाजूंना (उत्तर आणि दक्षिण) वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या छताने दुसऱ्या मजल्याचे छप्पर देखील झाकले जाईल. हे कामही प्रगतीपथावर आहे.

4. साधारणपणे दगडी मंदिरामध्ये, दगडी छताच्या वर विद्युतवाहिन्यांचे पाईप आणि जंक्शन बॉक्स असतात. छप्परामध्ये छिद्र करून हे पाईप खाली घेतले जातात. पहिल्या मजल्यावर विद्युतजोडणी, वॉटरप्रूफिंग आणि फ्लोअरिंगचे काम सुरू असल्याने आहे. त्यामुळे पावसाचे पाणी सर्व जंक्शन बॉक्समध्ये शिरले आणि तेच पाणी विद्युतवाहिन्यांच्या पाईपींगच्या बाजूने तळमजल्यावर पडले. प्रथम पहातांना छतावरून पाणी गळत असल्यासारखे वाटत होते; मात्र प्रत्यक्षात पाईपवरून पाणी बाहेर येत होते. वरील सर्व कामे लवकरच पूर्ण होतील, पहिला मजला पूर्णपणे वॉटरप्रूफ केला जाईल आणि कोणत्याही जंक्शनमधून पाणी येणार नाही.

5. पावसाच्या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होण्यासाठी सुनियोजित रितीने व्यवस्था करण्यात आली आहे. बांधकाम देखील प्रगतीपथावर आहे. पावसाच्या पाण्यासाठी बाहेर शून्य पाण्याचा विसर्ग करण्यासाठी संपूर्ण श्रीरामजन्मभूमी परिसराचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. श्रीरामजन्मभूमीच्या परिसरातील पावसाचे पाणी पूर्णपणे आत साठवण्यासाठी पुनर्भरण खड्डा देखील बांधला जात आहे.

6. मंदिर आणि परकोटाचे बांधकाम हे भारतातील दोन सर्वांत प्रतिष्ठित कंपन्या एल अँड टी आणि टाटा यांचे अभियंते आणि अनेक पिढ्यांपासून दगडांनी मंदिरे बांधण्याच्या परंपरेचे विद्यमान वारसदार चंद्रकांत सोमपुराजी यांचे पुत्र आशिष सोमपुरा यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तींच्या देखरेखीखाली केले जात आहे.

7. पहिल्यांदाच उत्तर भारतात लोखंडाचा वापर न करता उत्तर भारतीय नागरी शैलीत मंदिर बांधले जात आहे. देश-विदेशात केवळ स्वामी नारायण परंपरेची मंदिरे दगडी शैलीत बांधली जात आहेत. देवाची मूर्ती प्रतिष्ठापित करणे, दर्शन आणि पूजन हे केवळ दगडी मंदिरात शक्य आहे. (Ayodhya Rammandir Leakage)

हेही पहा –  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.