Water Storage : मुंबईची तहान भागली; राज्यातील इतर धरणांची स्थिती काय ?

26
Water Storage : मुंबईची तहान भागली; राज्यातील इतर धरणांची स्थिती काय ?
Water Storage : मुंबईची तहान भागली; राज्यातील इतर धरणांची स्थिती काय ?

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आता हळूहळू वाढ होत असून यासर्व धरणांमध्ये पाण्याच्या साठा तब्बल सुमारे 96.20 टक्के एवढा जमा झाला आहे. (Water Storage) सलग दुसऱ्या दिवशी मुंबईच्या पाणी साठ्यात 3 टक्क्यांनी वाए झाली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून 90 क्क्यांवर स्थिर असलेल्या पाण्याची पातळी वाढून शुक्रवारी 93 टक्क्यांच्या पोहोचली होती, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाण्याची पातळी 96.20 टक्यावर पोहोचली आहे. त्यामुळे दोनच दिवसांमध्ये 6 टक्क्यांमध्ये वाढ झाल्याने मुंबईकरांवरील कोणत्याही पाणीकपातीचे संकट पूर्णपणे दूर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

(हेही वाचा – G-20 Summit : पंतप्रधानांनी सांगितले कोणार्क चक्राचे महत्त्व; हस्तांदोलन, विनोद, मिठी आणि पाहुण्यांचे सभास्थळी आनंदाने स्वागत)

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्यवैतरणा, भातसा, विहार, आणि तुळशी या सात तलावांमधून दरदिवशी 3900 दशलक्ष लिटर्स एवढा पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी यासर्व धरण तथा तलावांमध्ये 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. मागील दहा ते बारा दिवसांपासून हा पाणी साठा 90 टक्क्यांवर स्थिर होता, त्यामुळे शुक्रवारी हा पाणीसाठा 93 टक्क्यांवर पोहोचला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी हा पाणी साठा 96.20 टक्क्यांवर पोहोचला. राज्यभर सुरु असलेल्या पावसामुळे तसेच नाशिक शहरात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे सर्व धरणांमधील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली गेल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एकाच दिवसांत अप्पर वैतरणा धरणातील एकूण पाणी 81.45 टक्क्यांवरुन 87 टक्यांवर पोहोचला आहे, तर भातसा धरणातील पाणी 93.38 टक्क्यांवरुन 97.05 टक्के एवढा पाणी साठा जमा झाला आहे. त्यामुळे भातसा, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा धरण सोडल्यास उर्वरीत सर्व धरणांमधील पाणीसाठा हा 100 टक्के जमा झाला आहे.

मुंबईतील 09 सप्टेंबरपर्यंतचा पाणी साठा

2023 : 13 लाख 92 हजार 393 दशलक्ष लिटर्स (96.20 टक्के)

2022: 14 लाख 20 हजार 929 दशलक्ष लिटर्स (98.17 टक्के)

2021: 13 लाख 54 हजार 996 दशलक्ष लिटर्स (94.31 टक्के )

गेले काही दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत; परंतु मुंबईबाहेरील धरणक्षेत्रांमध्ये पाऊस समाधानकारक झालेला नाही. सध्या राज्यातील एकूण धरणांमध्ये 66.07 टक्के जलसाठा आहे. मागील 24 तासांत धरणातील जलसाठ्यात फक्त 0.77 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षी याचवेळी राज्यातील धरणांमध्ये 85.71 टक्के जलसाठा होता.उजनी धरणात 18.28 टक्के पाणीसाठा आहे. उजनी धरणात पाण्याची आवक होत असल्याने या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे; मात्र मागच्या वर्षी उजनी 100 टक्के भरल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. यंदा त्याचे नियोजन सिंचन विभागाला करावे लागणार आहे. जायकवाडीत 32.55 टक्के जलसाठा आहे. धरणांमधून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत होत असल्याने जायकवाडीत देखील आवक अपेक्षित आहे. मात्र, मागच्या वर्षी याचवेळी धरण 98 टक्के भरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली होती. यंदा मात्र पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. जायकवाडी धरणावर मराठवाड्यातील संभाजीनगर शहरांसोबतच अनेक गावे पाण्यासाठी विसंबून आहेत. कोकणात यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत अधिकचा जलसाठा आहे. कोकण विभागातील धरणांमध्ये 92.25 टक्के जलसाठा, मागच्या वर्षी याचवेळी 88.81 टक्के पाणीसाठा होता. नाशिक विभागात मागील 24 तासात धरणांमध्ये 3 टक्के जलसाठा वाढला होता. नाशकातील धरणांमध्ये 65.16 टक्के पाणीसाठा होता. नागपूर विभागातील धरणांमध्ये 79.10 टक्के जलसाठा तर अमरावती विभागातील धरणांमध्ये 72.28 टक्के पाणीसाठा आहे. कोयना धरणात मागच्या वर्षी याचवेळी 95.03 टक्के पाणीसाठा होता, आज कोयना धरणात 80.68 टक्के जलसाठा आहे. (Water Storage)

या वर्षी नैऋत्य मान्सूनचे उशिरा आगमन झाल्याने जून महिन्यात फक्त 557.2 मिमी पावसाची नोंद झाली होती. जुलै  महिन्यात पावसाने सर्व कसर भरून काढत तब्बल 1501.6 मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद केली होती. यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे काठोकाठ भरल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण ऑगस्ट  महिन्यात  पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांसह सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले होते. आणखी 8-10 दिवस पावसाने दडी मारली असती, तर दुष्काळी स्थिती निर्माण झाली असती. आता पाऊस सुरु झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. (Water Storage)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.