kurla Fire : कुर्ल्यातील इमारतीला मध्यरात्री भीषण आग, 39 रहिवासी जखमी

90
kurla Fire : कुर्ल्यातील इमारतीला मध्यरात्री भीषण आग, 39 रहिवासी जखमी
kurla Fire : कुर्ल्यातील इमारतीला मध्यरात्री भीषण आग, 39 रहिवासी जखमी

कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर हॉस्पिटलजवळील एसआरए इमारतीला भीषण आग लागली. ही घटना मध्यरात्री घडली. या दुर्घटनेत 39 लोकं जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेबाबत अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कुर्ल्यातील कोहिनूर हॉस्पिटलजवळील एसआसए इमारतीला लागलेली आग तळमजल्यापासून १२व्या मजल्यापासून पोहोचली होती. ही आग लेव्हल – १ची होती. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले.

(हेही वाचा – Coconut : नारळाच्या पाण्यात हा पदार्थ मिक्स करा, वजन झपाट्याने होईल कमी)

इलेक्ट्रिंग वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, इलेक्ट्रिक डक्टमधील स्क्रॅप मटेरियल इत्यादींपर्यंतच ही आग मर्यादित होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून ही माहिती मुंबई महापालिकेने एएनआय वृतसंस्थेला दिली. या आगीच्या घटनेचा सोशल मिडियावर व्हिडियो व्हायरल होत असून आगीमुळे धुराचे लोट आकाशात उडत असल्याचे दिसत आहे. आग आटोक्यात आणायला अग्निशमन दलाला यश मिळाले असले, तरी आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.