Konkan Railway मार्गावरील प्रवास सुलभ होणार, उन्हाळी सुट्टीनिमित्त विशेष रेल्वे सेवेचे नियोजन

96
Konkan Railway : कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा! विनाआरक्षित ४ विशेष गाड्या शनिवारपासून सेवेत; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Konkan Railway : कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा! विनाआरक्षित ४ विशेष गाड्या शनिवारपासून सेवेत; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Konkan Railway उन्हाळी सुट्टी (summer vacation) आणि कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तसेच पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि गोवा येथील मडगावदरम्यान विशेष वातानुकूलित रेल्वे गाड्यांच्या चार फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे नियमित गाड्यांवरील ‘वेटिंग लिस्ट’चा ताण कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. (special train service planned )

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०११२९ ही CSMT येथून १० आणि १४ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री १२:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३:१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. तर परतीची गाडी क्रमांक ०११३० मडगाव येथून १० आणि १४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४:00 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३:४५ वाजता मुंबईत पोहोचणार आहे. या विशेष गाड्यांमध्ये पूर्णपणे वातानुकूलित व्यवस्था असणार असून १८ एसी ३-टियर इकॉनॉमी कोचेसचा समावेश असेल. प्रवाशांना तुलनेने कमी दरात आरामदायी प्रवास उपलब्ध व्हावा हा यामागील उद्देश आहे. तसेच गाडीमध्ये तांत्रिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने दोन जनरेटर व्हॅनही जोडण्यात येणार आहेत.

हेही वाचा  – NASA Artemis 2: चंद्रावर ऐतिहासिक प्रवास करून ‘ओरियन’ कॅप्सूल कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीवर उतरणार!

कोकणातील प्रवाशांचा Konkan special train service अधिकाधिक फायदा व्हावा यासाठी या गाड्यांना एकूण २३ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. मुंबईत दादर, ठाणे आणि पनवेल; रायगडमध्ये पेण, रोहा, माणगाव आणि वीर; रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली आणि इतर स्थानके; तसेच सिंधुदुर्गातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि गोव्यातील थिविम व करमळी या स्थानकांचा यात समावेश आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण आधीच सुरू करण्यात आले असून प्रवाशांना तिकिटे IRCTC (IRCTC) संकेतस्थळ किंवा रेल्वे आरक्षण केंद्रांवरून बुक करता येणार आहेत.

उन्हाळ्यातील वाढती मागणी लक्षात घेता या फेऱ्यांमुळे कोकण मार्गावरील (Konkan Railway route) प्रवास अधिक सुलभ होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) व्यक्त केला आहे. दरम्यान, प्रवाशांकडून आणि स्थानिक रेल्वे संघटनांकडून अशा विशेष गाड्या नियमित स्वरूपात वाढवण्याची मागणीही पुढे येत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.