Konkan News : मध्य रेल्वेकडून कोकण रेल्वे तिकिट आरक्षणातील काळाबाजार उघड

यंदा १९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवास आरंभ होत आहे. याच पार्श्वभूमीवर १२० दिवस आधीपासून रेल्वेचे तिकिट आरक्षण सुरु झाले होते.

392
Konkan News : मध्य रेल्वेकडून कोकण रेल्वे तिकिट आरक्षणातील काळाबाजार उघड
Konkan News : मध्य रेल्वेकडून कोकण रेल्वे तिकिट आरक्षणातील काळाबाजार उघड

दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील चाकरमानी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी सज्ज आहेत. अशातच गणेशोत्सवासाठीच्या रेल्वे तिकीट आरक्षणाचा काळाबाजार उघड झाला आहे. मध्य रेल्वेने या सर्व प्रकार उघड केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने केलेल्या चौकशीत १६४ तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे रेल्वे तिकिट आरक्षणात झालेल्या गैरप्रकारामुळे चाकरमान्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे.

यंदा १९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवास आरंभ होत आहे. याच पार्श्वभूमीवर १२० दिवस आधीपासून रेल्वेचे तिकिट आरक्षण सुरु झाले होते. अशातच कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादीही अवघ्या दीड मिनिटात हजारांच्या पार गेली होती. त्यानंतर मध्य रेल्वेने केलेल्या चौकशीत १६४ तिकीट आरक्षण खाती ही बनावट असल्याचे उघड झाले. या बनावट खात्यांद्वारे १८१ तिकिटे काढण्यात आली आहेत.

(हेही वाचा – ईडीच्या अधिकाऱ्यांनी मध्यवर्ती खरेदी खात्यातून त्या फायलिंमधील कागदपत्रे घेतली ताब्यात)

मे १८ रोजी प्रवाशांनी तिकीट आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू केली असता, अवघ्या दीड मिनिटात प्रतीक्षा यादी हजारो पार झाली. तसेच तुतारी, जनशताब्दी, मांडवी या एक्स्प्रेसची तिकिटे काढताना ‘रिग्रेट’ असा संदेश दाखविण्यात येत होता. मध्य रेल्वेने या प्रकरण्याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. तर संबंधित आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही मध्य रेल्वेने सांगितले आहे.

कोकणात शिमगा आणि गणेशोत्सव हे दोन सण पारंपारिक पद्धतीत मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या सणांचा आनंद घेण्यासाठी प्रत्येक चाकरमानी हमखास आपल्या गावी जातो. अशावेळी झालेल्या या तिकिटांचा गैरप्रकारामुळे चाकरमान्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.