Khalistanists Boycott: एअर इंडियाच्या विमानांवर खलिस्तानवाद्यांचा बहिष्कार

13
Khalistanists Boycott: एअर इंडियाच्या विमानांवर खलिस्तानवाद्यांचा बहिष्कार
Khalistanists Boycott: एअर इंडियाच्या विमानांवर खलिस्तानवाद्यांचा बहिष्कार

भारत सरकारच्या हिटलिस्टमध्ये समावेश असलेला खलिस्तानवादी (Khalistanists Boycott) शीख फॉर जस्टिस (SFJ) दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने आता मोहालीच्या चंदीगड विमानतळाबाहेर खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत. पन्नूने त्याचा आणखी एक व्हिडियो जारी करत रविवारपासून एअर इंडियाच्या विमानांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली.

एसएफजेला अमृतसर-अहमदाबाद-दिल्ली विमानतळावर प्रवेश आहे, अशी धमकी पन्नूने दिली. शीख राष्ट्राच्या हिताचे रक्षण करण्यासाठी रविवारपासून एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करू नका, कारण त्यामुळे भावी शीख पिढ्या धोक्यात येतील, असे त्याने व्हिडियोद्वारे सांगितले आहे.

(हेही वाचा – Hindu Leaders : हिंदुत्वरक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेले नेते आणि कार्यकर्ते ! )

काही दिवसांपूर्वी पन्नूने एक व्हिडियो जारी करत रविवारपासून एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये प्रवास करू नका अन्यथा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्याची धमकी दिली होती, अशी माहिती देणारा व्हिडियोही पन्नूने जारी केला होता.

या व्हिडियोमध्येच पन्नू पुढे सांगतो की, भारताने शीखांवर अत्याचार केले आहेत. पंजाबला भारतापासून वेगळे केल्यानंतर आम्ही दिल्ली विमानतळाचे नाव बदलून बिआंत सिंग, सतवंत सिंग यांच्या नावावर ठेवतील. बिआंत सिंग आणि सतवंत सिंग हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे अंगरक्षक होते. त्यांनी ३१ ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी यांच्यावर गोळीबार करून हत्या केली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.