KDMC : एल निनोमुळे पावसाळा लांबण्याची शक्यता, ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे नागरिकांना आवाहन

101
KDMC : एल निनोमुळे पावसाळा लांबण्याची शक्यता, ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे नागरिकांना आवाहन
KDMC : एल निनोमुळे पावसाळा लांबण्याची शक्यता, ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे नागरिकांना आवाहन
  • कल्याण : प्रतिनिधी

भारतीय हवामान खात्याने घोषित केल्यानुसार यावर्षी एल निनोच्या (El Niño) प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता असल्याने ३१ ऑगस्टपर्यंत पेयजलाचे नियोजन करण्याचे निर्देश सन २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्राप्त आहेत. त्यानुसार याबाबत जलसंपदा विभागा सोबत १४ मे रोजी झालेल्या बैठकीमधील निर्णयाप्रमाणे, आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये, यासाठी सर्व महानगरपालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व अन्य प्राधिकरणांनी वेळोवेळी समन्वयाने पाणी कपात करण्याचे ठरले आहे.

त्यानुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) बारावे, मोहिली, नेतिवली व टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणी पुरवठा (Water supply) शुक्रवार २२ मे रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत १२ तासांकरिता पाणी पुरवठा बंद राहणार आहे अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश डावरे यांनी दिली.

(हेही वाचा – Iran Tensions : होर्मूझमधील वाहतूकही पूर्ववत होत असल्याचे संकेत)

शुक्रवारी पाण्याचे शटडाऊन

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) बारावे, मोहिली, नेतिवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रामधून कल्याण (पूर्व व पश्चिम), कल्याण ग्रामीण विभाग (मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी व कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे) व डोंबिवली (पूर्व व पश्चिम) परिसरास होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी २२ मे रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत १२ तासांकरीता बंद राहणार असून महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आवश्यक इतकाच पाणी साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश डावरे यांनी केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.