Holi In Kashi Ayodhya : होळीच्या रंगात रंगली काशीनगरी; अयोध्येत यंदा ५०० वर्षांनी साजरा झाला सण

Holi In Kashi Ayodhya : राम मंदिरातील पहिल्या होळीच्या दिवशी रामलल्लाला संतांनी विशेष गुलाल लावला आणि दागिन्यांनी सुशोभित केला. या वेळी मंदिरांमध्ये होळीची विशेष गाणी लावण्यात आली.

143
Holi In Kashi Ayodhya : होळीच्या रंगात रंगली काशीनगरी; अयोध्येत यंदा ५०० वर्षांनी साजरा झाला सण
Holi In Kashi Ayodhya : होळीच्या रंगात रंगली काशीनगरी; अयोध्येत यंदा ५०० वर्षांनी साजरा झाला सण

रंगांचा पाऊस आणि गुलालने रंगलेल्या वातावरणात काशी, अयोध्यानगरी सजल्या आहेत. अनेक ठिकाणी लोकांनी एकमेकांना रंग लावला आणि सणाच्या शुभेच्छा दिल्या. काशीनगरीच्या गोदौलिया, लाहुरबीर, सोनारपुरा, लंका, सिगरा, रथयात्रा चौकात होळीचा उत्साह दिसून आला. गंगेच्या घाटांवर परदेशी पर्यटकही होळीच्या रंगांनी भिजलेले दिसले. परदेशी पर्यटक स्थानिक तरुणांसोबत ढोलांच्या तालावर घाटांवर नाचण्याचा आनंद घेतांना दिसले. (Holi In Kashi Ayodhya)

होळीच्या उत्सवात आणि गर्दीत पोलीस अधिकारीही सक्रिय आहेत. शहरातील सर्व महत्त्वाच्या चौकात मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या काळात काही लोकांनी त्यांना अबीर गुलालने रंगवले. हा रमजानचा महिना चालू असल्याने मुस्लिमबहुल भागात अतिरिक्त सतर्कता पाळली जात आहे.

(हेही वाचा – Highest Score in IPL : आयपीएलमध्ये डावात २०० पेक्षा जास्त धावा किती वेळा झाल्यात? )

अयोध्येत रामलल्लाला लावला गुलाल

होळीच्या पाश्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिरही (Ayodhya Rammandir) होळीच्या रंगात रंगून गेले आहे.  या वर्षीची होळी रामभक्तांसाठी विशेष असणार आहे, कारण रामलल्ला त्याच्या भव्य-दिव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. रत्नजडीत सुवर्णालंकारांनी प्रभू श्रीरामाला सजवण्यात आलं आहे. ‘रामलल्ला’च हे रुप अतिशय दिव्य दिसत आहे.

राम मंदिरातील पहिल्या होळीच्या दिवशी रामलल्लाला संतांनी विशेष गुलाल लावला आणि दागिन्यांनी सुशोभित केला. या वेळी मंदिरांमध्ये होळीची विशेष गाणी लावण्यात आली. (Holi In Kashi Ayodhya)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.