
-
कल्याण, प्रतिनिधी
Kalyan मदर्स डे निमित्त इनरव्हील क्लब ऑफ कल्याण डायमंड्स आणि कल्याण मम्मीज् यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आनंदी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मातृत्वाचा सन्मान आणि महिलांच्या कला-गुणांना वाव देणाऱ्या या सोहळ्याला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी विशेष उपस्थिती लावून आयोजक महिलांचे मनोबल वाढविवले. (Kalyan)
कल्याणच्या मंगेशी सेलिब्रेशन बँक्वेट येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात महिलांसाठी विविध रंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मातांसाठी जोडीने केलेली रॅम्प वॉक, आरोग्य जनजागृती सत्रे, डीजे आणि नृत्याचा आनंद तसेच विविध खेळांचा समावेश होता. या उपक्रमातून केवळ मनोरंजनच नव्हे, तर महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकताही निर्माण करण्यात आली. आयोजित सोहळ्यात गृह उद्योग करणाऱ्या महिलांनी विविध प्रकारचे स्टोल लावून आपल्या व्यवसायाचे प्रोमोशन केले, ज्याला इतर महिलांनी खरेदीद्वारे प्रोत्साहन दिले. (Kalyan)
(हेही वाचा – Srinagar मध्ये फैसल, अहमदकडे मिळाले लष्कर-ए-तय्यबाचे पोस्टर; १ पिस्तूल, ३ मॅगझिन आणि २१ जिवंत काडतुसे जप्त)
आयोजित सोहळ्या प्रसंगी बोलताना महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी आयोजक महिलांचे भरभरून कौतुक केले. त्या म्हणाल्या, मातृत्वाचा असा गौरव करणे ही कौतुकास्पद बाब आहे. महिलांनी एकत्र येऊन असे विधायक उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात एक सकारात्मक संदेश जातो. तसेच आगामी काळातही अशा उपक्रमांना आपले सदैव सहकार्य आणि पुढाकार राहील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. (Kalyan)
भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या प्रेरणेतून या कार्यक्रमाचे नामकरण आनंदी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेसिडेंट डॉ. तृप्ती बोबडे, सेक्रेटरी अस्मिता वेखंडे आणि प्रोजेक्ट चेअर प्रतिभा गटकळ, प्रतिभा ठोके, निकिता रोहित, प्रतिभा पराते, सरला एरंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ. स्मिता महाजन यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. डॉ. अश्विन कक्कर यांच्या वैष्णवी मॅटर्निटी होम, पिंक अँड ब्लूज सलून, मायनीडमार्ट, हेम फ्रॅग्रन्स आणि अन्नपूर्णा फूड्स यांसारख्या संस्थांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले होते. रात्री स्नेहभोजन आणि केक कापून या अविस्मरणीय सोहळ्याची सांगता झाली. (Kalyan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
