-
कल्याण : प्रतिनिधी
Kalyan : कल्याण-पडघा मार्गावरील वर्दळीच्या गांधारी उड्डाणपुलावर (Gandhari Bridge) अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या गर्डरवरील लोखंडी संरक्षक पट्टी गायब झाल्याचे या भागातील जागरूक रहिवासी राहूल कारभारी यांनी उघडकीस आणले आहे. या प्रकारामुळे पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या ठिकाणी निर्माण झालेल्या फटीतून थेट खाली गांधारी नदीचे (Gandhari River) पात्रही दिसत आहे.
(हेही वाचा – Ind vs SL, Test Series : गौतम गंभीरच्या ताफ्यात मोठा बदल, संघाला मिळणार नवीन क्षेत्ररक्षणाचा प्रशिक्षक)
यापूर्वीच पुलावर मोठे खड्डे असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यातच आता संरक्षक पट्टी निखळल्याने रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. अवजड वाहने, दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पुलावरील लोखंडी संरक्षक पट्टी त्वरित बसवावी. तसेच पुलावरील खड्ड्यांची युद्धपातळीवर दुरूस्ती करावी, अशी मागणी पादचारी आणि वाहनचालकांसह या भागातील स्थानिक जागरूक रहिवासी राहूल कारभारी यांनी केली आहे.
गांधारी पुलावरील धोके
कल्याण-पडघा मार्गावरी (Kalyan-Padgha Road) गांधारी उड्डाणपूल वाहनांसाठी धोकादायक बनला आहे. संरक्षक लोखंडी पट्टी गायब झाल्या असून मोठे खड्डेही पडले आहेत. फटीतून चक्क नदी दिसत आहे. रात्री व पावसाळ्यात अपघाताची शक्यता वाढली आहे. तातडीने बॅरिअर बसवणे व खड्डे बुजवणे, अशा सूचना स्थानिक जागरूक रहिवासी राहूल कारभारी यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

