धक्कादायक! कुटुंबासोबत राहूनही मुलं बनताहेत गुन्हेगार

108

वडाळ्यातील महापालिकेच्या एका शाळेत आठवीच्या विद्यार्थ्यांकडून वर्गमैत्रिणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने सर्वांनाच सुन्न केले. एनसीआरबीच्या 2021 च्या अहवालातील आकडेवारी पाहता देशातील बालगुन्हेगारी हा चिंतेचा विषय ठरत आहे. हलाखीची कौटुंबिक स्थिती, पालकांचे दुर्लक्ष, वाईट संगत आणि जडलेली व्यसने, त्यात नेटवर्किंगबरोबर पाॅर्नचे वाढते जाळे यामुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या वाटेकडे वळताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक बालगुन्हेगार हे पालकांसोबतच राहतात. राज्यात एकूण दखलपात्रे गुन्हे 4 हजार 554 तर 5 हजार 615 अल्पवीयन मुलांचा गुन्ह्यात समावेश आहे.

( हेही वाचा: FIFA World Cup 2022: मारिया रेबेलो ठरली भारताची पहिली रेफ्री )

मुंबई चौथ्या क्रमांकावर

  • गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, बालगुन्हेगारीत दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद पाठोपाठ मुंबईचा चौथा क्रमांक लागतो.
  • 2020 मध्ये मुंबईत 332 गुन्ह्यांची नोंद झाली. 2019 आणि 2018 च्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. या गुन्हेगारीत 16 ते 18 वयोगटातील बालकांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

पालकांचे दुर्लक्ष कारणीभूत

हलाखीची कौटुंबिक स्थिती, पालकांचे दुर्लक्ष आणि जडलेली व्यसने, त्यात नेटवर्किंगबरोबर पाॅर्नचे वाढते जाळे यामुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या वाटेकडे वळताना दिसत आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.