जुहू चौपाटी होणार प्रकाशमय आणि सुशोभित

71

मुंबईच्या सुशोभिकरणाअंतर्गत आता जुहू चौपाटीचेही सुशोभिकरण केले जात असून त्याच्या सौंदर्यीकरणासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मुंबई शहराचा सर्वांगिण विकास करत असताना मुंबईतील नागरिकांना व इतर पर्यटकांना सर्व सुविधांचा पुरेपूर लाभ व्हावा या हेतूने मुंबई सुशोभिकरण अभियान राबवण्यात येत असून या अंतर्गत जुहू चौपाटीचे सौंदयीकरण केले जात आहे. त्यामुळे जुहू चौपाटीवर प्रकाश योजना, शोभिवंत कुंड्या, सुशोभित दिवे तसेच पदपथांची सुधारणा, कलात्मक भिंत रंगवणे आदी प्रकारची कामे केली जाणार आहे. यासाठी के पश्चिम विभागाने मागवलेल्या निविदेमध्ये दिपम कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीला ४ कोटी ८४ लाखांचे कंत्राट देण्यात आले आहे.

(हेही वाचा जळगावमध्ये सप्तश्रृंगी देवीच्या पालखीवर मुसलमानांकडून दगडफेक )

सन २०१६मध्ये जुहू चौपाटीच्या सुशोभिकरणाची कार्यवाही करण्यात आली होती, यामध्ये अत्याधुनिक व बदलती रंगसंगती असणाऱ्या दिव्यांनी उजळून निघाली होती. शिडाच्या नौकेच्या प्रारुपात दिवे बसवयात आले होते. हे दिवे जुहू चौपाटीचे विशेष आकर्षण ठरले होते. या चौपाटीवर १० मीटर उंचीचे वैशिष्टयपूर्ण असे १०० खांब बसवण्यात आले होते. या खांबावर टेन्साईल फॅब्रिक पासून तयार केलेल्या शिडाच्या प्रारुप बसवण्यात आली होती. या खांबावर गोबो प्रोजेक्टर्सही होते. याद्वारे समुद्राच्या भरतीच्या पाण्यावर किंवा चौपाटीवरील वाळूवर गरजेनुसार सामाजिक संदेश दिला जाणार होतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.