Job Alert : आरोग्य विभागात मेगा भरती

तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती यामध्ये केली जाणार आहे

111
Job Alert : आरोग्य विभागात मेगा भरती
Job Alert : आरोग्य विभागात मेगा भरती

आरोग्य विभागात कमी मनुष्यबळ असल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत होता. त्यामुळे सातत्याने याबाबतच्या तक्रारी येत होत्या. सरकार आणि आरोग्य विभाग लवकरच यावर तोडगा काढेल, अशी चर्चा होती. अखेर आरोग्य विभागाने या प्रकरणी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आरोग्य विभागात आता मेगा भरती होणार आहे. तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती (Job Alert) यामध्ये केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी सोमवारी (२८ ऑगस्ट) दिली.
तीन वर्षांपासून रखडलेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरु होणार आहे. तत्कालीन सरकारच्या काळात २०२१ साली आरोग्य विभागात राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेवेळी पेपरफुटीचा घोटाळा झाला होता. त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबली होती. आता पुन्हा एकदा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने आणि पाठपुराव्यानंतर आरोग्य विभागातील मेगा भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

(हेही वाचा :Chandrayan-3 : प्रज्ञान रोव्हरने पार केला चंद्रावरील पहिला अडथळा)

’क’ वर्गातील ५५ प्रकारचे विविध पदे, तसंच ‘ड’ वर्गातील ०५ प्रकारची विविध पदे भरली जाणार आहेत, अशी एकूण १०हजार ९४९ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मंगळवारी (२९ ऑगस्ट) पासून ह्या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.