‘लव्ह जिहाद’ला खतपाणी घालणारा ‘जमात-ए-इस्लामी हिंद’चा कार्यक्रम हिंदूंनी हाणून पाडला

111

तेलंगणा येथील काश्मीर गड्डाजवळील शालिमार फंक्शन हॉलमध्ये ३० ऑक्टोबर या दिवशी ‘जमात-ए-इस्लामी हिंद’ संघटनेने मुसलमानेतर तरुणी आणि महिला यांचा भव्य मेळावा आयोजित केला होता. मात्र या मेळाव्याला परवानगी देण्यात येऊ नये, अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली. त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला.

विश्व हिंदू परिषदेने केलेला विरोध 

जमात-ए-इस्लामी हिंद या सामाजिक आणि धार्मिक संघटनेच्या महिला शाखेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात मुसलमानेतर तरुणी आणि महिला यांना दुपारचे जेवण देण्यात येणार होते; मात्र विश्‍व हिंदु परिषदेने करीमनगर पोलीस आयुक्तांकडे ‘या कार्यक्रमाला अनुमती देऊ नये’, अशी विनंती केली होती. जर हा कार्यकम झाला, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा विहिंपने दिला होता. जमात-ए-इस्लामी हिंद ही संघटनांना हिंदु तरुणींना लव्ह जिहादमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप विहिंपच्या गोरक्षा शाखेचे अध्यक्ष वुतुकुरु राधाकृष्ण रेड्डी यांनी केला. या कार्यक्रमामुळे हिंदूंच्या स्वाभिमानाला धक्का बसला. जमात-ए-इस्लामी हिंदच्या सदस्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, तसेच हिंदु तरुणींनी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहू नये, असे विहिंपने म्हटले होते.

(हेही वाचा जांबमधील श्रीरामाच्या मूर्ती चोरणाऱ्या मुस्लिम आरोपींचे वकीलपत्र घेण्यास वकिलांचा नकार )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.