ISRO: इस्रोचे पुढचे लक्ष्य चांद्रयान -४ मोहिमेवर केंद्रित, एस. सोमनाथ यांची माहिती

अंतराळ संशोधन ही सातत्याने सुरू असणारी प्रक्रिया आहे. देश झपाट्याने या क्षेत्रात प्रगती करत आहे. आता आम्ही चांद्रयान-४ मोहिमेवर काम करत आहोत.

109
ISRO: इस्रोचे पुढचे लक्ष्य चांद्रयान -४ मोहिमेवर केंद्रित, एस. सोमनाथ यांची माहिती

भारताने चांद्रयान -३ यशस्वी करून अंतराळ क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे. या यशस्वी मोहिमेनंतर आदित्य एल-१ ही सूर्याची माहिती मिळवण्याची मोहिमही यशस्वी होत आहे. आता इस्रोने आपले पुढचे लक्ष्य चांद्रयान -४ मोहिमेवर केंद्रित केले आहे. इस्रो चांद्रयान -४ मोहिमेवर काम करत असून २०२४ पर्यंत भारतीय व्यक्ती चंद्रावर उतरवण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली आहे. पंजाबमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. (ISRO)

अंतराळ संशोधन ही सातत्याने सुरू असणारी प्रक्रिया आहे. देश झपाट्याने या क्षेत्रात प्रगती करत आहे. आता आम्ही चांद्रयान-४ मोहिमेवर काम करत आहोत. या मोहिमेद्वारे २०४० पर्यंत चंद्रावर हिंदुस्थानी व्यक्तीला उतरवण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. त्यासाठी इस्रो तयारी करत आहे. या मोहिमेसाठी चंद्राबाबत अधिक माहिती मिळवत यश मिळवण्यात येणार आहे तसेच या मोहिमेद्वारे चंद्रावरील माती आणि धातूनचे नमुने मिळवून ते आणून अधिक संशोधन करण्यात येणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या चांद्रयान-४ मोहिमेनंतर चंद्राबाबत अधिक माहिती मिळणार असून संशोधनाला नवी दिशा मिळेल, असेही सोमनाथ यांनी सांगितले.

(हेही वाचा – MNS : राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मनसेला कोणी केला अखेरचा जय महाराष्ट्र ?)

१४ जुलै २०२३ला चांद्रयान -३ मिशन लाँच केले
भारताने १४ जुलै २०२३ला चांद्रयान -३ मिशन लाँच केले होते. २३ ऑगस्टला चांद्रयान – ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले होते तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला होता. या मोहिमेने अंतराळ क्षेत्रात हिंदुस्थानची मोहर उमटवली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.