Irctc Tour Package: रामायणाशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी ‘द रामायण सागा’ टूर पॅकेज, आयआरसीटीसीची खास योजना

181
Irctc Tour Package: रामायणाशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी 'द रामायण सागा' टूर पॅकेज, आयआरसीटीसीची खास योजना
Irctc Tour Package: रामायणाशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी 'द रामायण सागा' टूर पॅकेज, आयआरसीटीसीची खास योजना

अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर लाखो भाविक अयोध्येत दाखल होत आहेत. त्यामुळे रामायणाशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी आयआरसीटीसीने (IRCTC) उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथून श्रीलंकेपर्यंत हवाई टूर पॅकेज सुरू केले आहे. आयआरसीटीसीने या पॅकेजला (Irctc Tour Package) ‘द रामायण सागा’ टूर पॅकेज असे नाव दिले आहे.

आयआरसीटीसीच्या (Irctc Tour Package) लखनौ कार्यालयाने लखनौ ते श्रीलंका हे ७ दिवस आणि ६ रात्रीचे टूर पॅकेज लॉन्च केले आहे. हे टूर पॅकेज ९ मार्च २०२४ ते १५ मार्च २०२४ पर्यंत असणार आहे. ‘द रामायण सागा’ या नावाने चालवल्या जाणाऱ्या या टूर पॅकेजमध्ये कोलंबोमधील मुनेश्वरम मंदिर, कँडीमधील मनावरी राम मंदिर आणि स्पाइस गार्डन, रामबोडा वॉटर फॉल, टी गार्डन, न्यूआरा एलियामधील सीता अम्मा मंदिर, अशोक वाटिका, ग्रेगरी लेक, दिवारुम्पोला मंदिर (सीता अग्नि चाचणी स्थळ), कोलंबो, कँडी आणि न्यूआरा एलिया या ठिकाणी आयआरसीटीसीद्वारे भेट घेता येईल.

(हेही वाचा – PM Modi Criticize Congress : जनतेचा आशीर्वाद असेल, तर विरोधक प्रेक्षक गॅलरीतही बसतील; पंतप्रधानांची कॉंग्रेसवर सडकून टीका)

या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांसाठी लखनौ ते कोलंबो आणि लखनौ परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या हवाई टूर पॅकेजमध्ये, राउंड ट्रिप हवाई प्रवास, तीन तारांकित हॉटेलमध्ये निवास, भारतीय भोजन व्यवस्था (नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण) आयआरसीटीसीद्वारे केले जाईल. तसेच, या टूर पॅकेजसाठी, सोबत राहणाऱ्या तीन व्यक्तींसाठी पॅकेजची किंमत 71000 रुपये प्रति व्यक्ती अशी निश्चित करण्यात आली आहे. तर दोन व्यक्ती एकत्र राहण्यासाठी पॅकेजची किंमत ७२२०० रुपये प्रति व्यक्ती आहे. एका व्यक्तीच्या मुक्कामासाठी पॅकेजची किंमत 88800 रुपये प्रति व्यक्ती आहे. तसेच, आई-वडिलांसोबत राहणाऱ्या प्रत्येक मुलासाठी पॅकेजची किंमत ५७,३०० रुपये (बेडसह) आणि ५४,८०० रुपये (बेडशिवाय) प्रति व्यक्ती आहे. (Irctc Tour Package)

या संदर्भात माहिती देताना आयआरसीटीसीचे उत्तर प्रदेश लखनौचे मुख्य प्रादेशिक व्यवस्थापक अजित कुमार सिन्हा म्हणाले की, या पॅकेजचे बुकिंग पहिल्यांदा करणाऱ्यास प्राधान्य, या तत्त्वावर केले जाईल. तसेच, या टूरच्या बुकिंगसाठी, पर्यटन भवन, गोमती नगर, लखनौ आणि कानपूर येथे असलेल्या आयआरसीटीसी कार्यालयात आणि आयआरसीटीसी वेबसाइट www.irctctourism.com वरूनही ऑनलाइन बुकिंग करता येईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.