IPS Officer Transfer : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल, ५८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

या बदल्यांमध्ये पुण्याचे आयुक्त रितेश कुमार, नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, प्रभात कुमार, रवींद्र सिंघल, दीपक पांडे, शिरीष जैन, दत्तात्रय कराळे, प्रवीण पडवळ आणि ज्ञानेश्वर चव्हाण या ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

379
IPS Officer Transfer : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल, ५८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिक्षेत्रात कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र मागील काही दिवसांपासून सुरू झाले आहे. राज्य शासनाकडून (State Govt) बुधवारी राज्यातील ५८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (IPS Officer Transfer) करण्यात आल्या आहे. या बदल्यांमध्ये पुण्याचे आयुक्त रितेश कुमार, नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, प्रभात कुमार, रवींद्र सिंघल, दीपक पांडे, शिरीष जैन, दत्तात्रय कराळे, प्रवीण पडवळ आणि ज्ञानेश्वर चव्हाण या ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (IPS Officer Transfer)

रितेश कुमार यांची पुणे आयुक्त पदावरून बदली (IPS Officer Transfer) करून त्यांना पदोन्नती देऊन होमगार्डचे महासदेशक म्हणून नेमणूक करण्यात आली असून पुणे आयुक्तपदी नागपूर शहरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली करण्यात आली आहे. राज्य वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक रवींद्र सिंघल यांची नागपूर शहर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. राज्य गुप्तचर विभागाचे सहआयुक्त शिरीष जैन यांना पदोन्नती देऊन राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. (IPS Officer Transfer)

ठाणे शहर सहपोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र येथे बदली करण्यात आली असून मुंबई वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्त प्रवीण पडवळ यांची विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण आणि पथके, ज्ञानेश्वर चव्हाण विशेष महानिरीक्षक छत्रपती सभांजी नगर ते ठाणे शहर, दीपक पांडे यांना पदोन्नती देऊन अप्पर पोलीस महासंचालक महिला बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग तर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांना पदोन्नती देऊन मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेचे अप्पर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. नामदेव चव्हाण पोलीस उप महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग ते विशेष पोलीस महानिरीक्षक, रा. रा. पोलीस बल, नागपूर [पदोन्नतीने] राजेंद्र माने पोलीस आयुक्त, सोलापूर शहर ते सह संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक, विनिता साहु समादेशक, रा. रा. पोलीस बल, गट क्र. ५, दौंड, पुणे ते अपर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, बृहन्मुंबई [पदोन्नतीने], एम. राजकुमार पोलीस अधीक्षक, जळगांव ते पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, अंकित गोयल पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण ते पोलीस उप महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र [पदोन्नतीने], बसवराज तेली पोलीस अधीक्षक, सांगली ते पोलीस उप महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे, शैलेश बलकवडे समादेशक, रा. रा. पोलीस बल, गट क्र. १, पुणे ते अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर [पदोन्नतीने] शहाजी उमाप नाशिक ग्रामीण अधिक्षक ते मुंबई विशेष शाखा अप्पर पोलीस आयुक्त, एस. जी. दिवाण, संजय शिंत्रे पोलीस अधीक्षक, सायबर, महाराष्ट्र राज्य, ते पोलीस उप महानिरीक्षक, दक्षता, वस्तु व सेवा कर विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई. (IPS Officer Transfer)

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

मनोज पाटील पोलीस उपायुक्त झोन ५ ते अप्पर पोलीस आयुक्त पुणे, विक्रम देशमाने ठाणे ग्रामीण अधीक्षक ते नाशिक ग्रामीण अधिक्षक, पंकज देशमुख पोलीस अधीक्षक गुन्हे शाखा ते पुणे ग्रामीण अधिक्षक, एम. सी. व्ही. महेश्वर रेड्डी पोलीस उपायुक्त मुख्यालय १ मुंबई ते पोलीस अधीक्षक जळगाव, अजय कुमार बन्सल पोलीस उपायुक्त परिमंडळ ११ ते पोलीस अधीक्षक जालना, रविंद्र सिंह परदेशी पोलीस अधीक्षक चंद्रपूर ते परभणी अधीक्षक. (IPS Officer Transfer)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.