Internet in Flight : ही पहिली भारतीय विमान कंपनी देणार वायफाय, ३५ हजार फुटांवरही मिळणार सुविधा

69

जेव्हा तुम्ही विमानाने प्रवास करता तेव्हा तुम्ही काही तासांसाठी जगापासून दूर असता. यावेळी प्रवासात मोबाईल फ्लाइट मोडमध्ये टाकावा लागतो. त्यामुळं विमानात इंटरनेट सेवा बंद असते. मात्र तुमचे विमान आता ३५ हजार फुटांवरून उडत असेल तरीदेखील आता विमानात देखील तुम्हाला मोफत इंटरनेट सेवा मिळणार आहे. टाटा समूहाची विमान वाहतूक कंपनी विस्ताराने विमान प्रवासादरम्यान प्रवाशांसाठी मोफत वायफाय सेवा (Internet in Flight)सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह विस्तारा एअरलाइन्स विमानात इंटरनेट सेवा देणारी पहिली भारतीय कंपनी ठरणार आहे.सध्याच्या घडीला अनेक परदेशी विमान कंपन्यांमार्फतही सुविधा दिली जाते.

टाटा सन्स आणि SIA च्या मालकीच्या विस्तारा एअरलाइन्सने अलीकडेच बोईंग 787-9 ड्रीमलायनर विमानात मोफत इंटरनेट सेवा देण्याची घोषणा केली होती. ही सुविधा सध्या दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGI) आणि लंडनच्या हिथ्रो विमानतळादरम्यान उपलब्ध आहे. आता कंपनी ही सेवा Airbus 321 Neo मध्ये देखील वाढवणार आहे. सर्व प्रवासी फ्लाइट दरम्यान मर्यादित काळासाठी या सेवेचा लाभ घेऊ शकतील.

(हेही वाचा : Virat Kohli Baffled : ‘हा’ सोशल व्हायरल ट्रेंड विराटलाही नव्हता माहित)

विस्तारा ठरली पहिली भारतीय कंपनी
Vistara ही WiFi मेसेजिंग लाँच करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना त्यांचे स्मार्टफोन, टॅब्लेट आणि लॅपटॉप वापरता येणार आहेत. आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या त्यांच्या प्रवाशांना या सेवेचा लाभ दीर्घकाळापासून देत आहेत. लांब पल्ल्याच्या उड्डाणांमध्ये ही सुविधा सुरु करण्यात आली होती. आता विस्तारा देखील या खास क्लबचा एक भाग होणार आहे.

नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी खूप फायदेशीर
जेव्हा तुम्ही विमान प्रवासात असता, त्यावेळी तुम्हाला जगात नेमकं काय चाललं याची कल्पना नसते. त्यामुळं जगातील अनेक विमान कंपन्यांनी मर्यादित इंटरनेट सेवा सुरु केली होती. ही सेवा कर्मचारी आणि व्यावसायिकांसाठी अतिशय फायदेशीर ठरली आहे. आता विस्तारा एअरलाइन्सने प्रवाशांना मोफत इंटरनेट सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.