Innovative Technology : नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरा….! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश…

राज्यात विशेषतः कोकण परिसर, डोंगरी भाग आणि प्रमुख नदी परिसरात आपत्तींना अटकाव करणाऱ्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे

116
Innovative Technology : नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरा....! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश...
Innovative Technology : नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरा....! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश...
मुंबई प्रतिनिधी
नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी, आपत्तीपूर्व अंदाज येण्यासाठी शासन नाविन्यपूर्ण संकल्पना राबवित असून विशेषतः कोकणातील सागरी किनारा क्षेत्रात पूर प्रतिबंधक बंधारे बांधणे, दरड कोसळण्यास अटकाव करणे, पूरप्रवण क्षेत्रात उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी येथे दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दरड प्रतिबंधक, धूप प्रतिबंधक कामांबाबत तांत्रिक सादरीकरणही करण्यात आले.
यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील,खासदार सुनील तटकरे,वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा,नियोजन विभागाचे सचिव सौरभ विजय, मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिव सोनिया  सेठी,पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, ‘सिग्नेट’चे प्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यात विशेषतः कोकण परिसर, डोंगरी भाग आणि प्रमुख नदी परिसरात आपत्तींना अटकाव करणाऱ्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. सार्वजनिक बांधकाम,जलसंपदा, जलसंधारण विभागासह आयआयटी मधील तज्ज्ञांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यासंदर्भात वापरण्यात येणाऱ्या आधुनिक,नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा. त्याचा आपल्या राज्यात कसा वापर करता येऊ शकतो, याबाबत अभ्यासपूर्ण अहवाल सादर करावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.