Mumbai News : दोन दिवस इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द; तर वंदे भारत एक्स्प्रेस दादरपर्यंतच; काय आहे कारण… 

129
Mumbai News : दोन दिवस इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द; तर वंदे भारत एक्स्प्रेस दादरपर्यंतच; काय आहे कारण... 
Mumbai News : दोन दिवस इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द; तर वंदे भारत एक्स्प्रेस दादरपर्यंतच; काय आहे कारण... 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाडीबंदर यार्डमध्ये रेल्वे मार्गिकेच्या जोडणीसाठी मध्य रेल्वेने शनिवार आणि रविवार मध्यरात्री सहा तासांचा ब्लॉक घोषित केला आहे. (Mumbai News) यामुळे शनिवार-रविवारी धावणारी (२२१०५/६) सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहे. तर मडगाव-सीएसएमटी वंदे भारत, दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहेत. शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी पहाटे ५ आणि शनिवारी रात्री ११ ते रविवारी पहाटे ५ या कालावधीत हा ब्लॉक आहे. (Mumbai News)

(हेही वाचा – Pune Car Accident : पुण्यात मद्यपी कारचालकाने केली ‘संतोष माने’ प्रकाराची पुनरावृत्ती)

ब्लॉकनंतर गती वाढणार 

सीएसएमटीवर एकूण १८ फलाट असून फलाट क्रमांक ८ ते १८वरून मेल-एक्स्प्रेस वाहतूक होते. रिकाम्या गाड्या वाडीबंदर/माझगाव यार्डमध्ये इंजिनच्या मदतीने देखभाल-दुरुस्तीसाठी दाखल करण्यात येतात. मार्गिका जोडणीमुळे ही वाहतूक वेगाने शक्य होणार आहे. (Mumbai News)

बदललेले वेळापत्रक
  • साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस (२२२२४) दादर स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहे.
  • सावंतवाडी-दादर तुतारी एक्स्प्रेस (११००४) पनवेल स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहे.
  • हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस (१२८१०) शनिवारी दादर स्थानकात रद्द करण्यात येणार.
  • मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस (१२०५२) रविवारी पनवेलपर्यंत चालवणार आहेत.
  • अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस शनिवारी ठाण्यात, भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस दादरमध्ये, रविवारी अमरावती-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि सिकंदराबाद-सीएसएमटी देवगिरी एक्स्प्रेस दादरमध्ये रद्द करण्यात येणार आहे.
तुतारी, जनशताब्दी पनवेलहून रवाना

दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस शनिवारी मध्यरात्रीनंतर ०१.१५ वाजता पनवेल स्थानकातून रवाना झाली. याचा परिणाम पनवेल स्थानकात दिसून आला. शनिवारी पहाटे पनवेल स्थानकात प्रवाशांची गर्दी दिसून आली. सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस रविवारी पहाटे ६.२५ वाजता पनवेल स्थानकातून रवाना होणार आहे. (Mumbai News)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.