Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! ‘या’ एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांना मिळणार FREE नाश्ता-जेवण!

134

भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी नेहमी उत्तम सोयी-सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत असते. तुम्हाला माहित आहे का? एक्स्प्रेसने प्रवास करताना तुम्हाला मोफत जेवण मिळण्याचा हक्कही आहे. परंतु हे केवळ विशेष परिस्थितीत घडते. तुम्हीही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला या नियमाची माहिती असणे आवश्यक आहे. प्रवास करताना अनेकदा हा नियम तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

कोणतेही पैसे खर्च करण्याची गरज नाही

रेल्वेने दिलेल्या सुविधेत मोफत जेवणाचीही सुविधा प्रवाशांना दिली जात आहे. परंतु जर तुम्हाला या सुविधेची माहिती नसेल, तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकणार नाही. कोणत्या परिस्थितीत तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता? जाणून घ्या… या सुविधेअंतर्गत, IRCTC कडून FREE जेवणाव्यतिरिक्त, तुम्हाला थंड पेय आणि पाण्यासाठी कोणतेही पैसे खर्च करावे लागणार नाहीत. पण तुमची ट्रेन उशिराने धावत असेल तरच प्रवाशांना या सुविधेचा लाभ मिळू शकतो.

(हेही वाचा – Indian Railways: रेल्वे प्रवास होणार स्वस्त, मोदी सरकार तयार करतेय ही योजना!)

एक्स्प्रेस ट्रेनच्या प्रवाशांना मिळणार सुविधा

भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, एक्स्प्रेसला नियोजित वेळेपेक्षा उशीर झाल्यास IRCTC च्या कॅटरिंग पॉलिसी अंतर्गत प्रवाशांना नाश्ता आणि जेवण दिले जाते. नियमांनुसार, जेव्हा तुमची ट्रेन 2 तास किंवा त्याहून अधिक उशिराने धावत असेल तेव्हा प्रवाशांना ही सुविधा मिळते. एक्स्प्रेस ट्रेनमधील प्रवाशांसाठी ही सुविधा आहे. जर तुम्ही शताब्दी, राजधानी आणि दुरांतो सारख्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवास करत असाल आणि दोन तास किंवा त्याहून अधिक उशीर झाला तर IRCTC तुमच्या नाश्ता आणि जेवणाची सोय करते.

… तर तुम्ही फ्रीमध्ये जेवण ऑर्डर करू शकतात

एक्स्प्रेसमध्ये मिळणाऱ्या नाश्त्यामध्ये चहा-कॉफी आणि बिस्किटे प्रवाशांना दिली जातात. संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये चहा किंवा कॉफीसह चार ब्रेड स्लाइस, एक बटर स्लाईस देण्याची तरतूद आहे. जेवणाच्या वेळी पोळी, डाळ आणि भाजी मोफत मिळते. काही वेळा त्यात वरण-भात किंवा भाजीही दिली जाते. ट्रेनला दोन तास किंवा त्यापेक्षा जास्त उशीर झाल्यास, तुम्ही नियमानुसार जेवण ऑर्डर करू शकता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.