Indian Air Force : इजिप्तमधील कैरो हवाई तळावर भारतीय वायुदलाचा ब्राईट स्टार-23 युद्धसरावात सहभाग

भारतीय वायूदलाच्या तुकडीचे आज उड्डाण

104
Indian Air Force : इजिप्तमधील कैरो हवाई तळावर भारतीय वायुदलाचा ब्राईट स्टार-23 युद्धसरावात सहभाग
Indian Air Force : इजिप्तमधील कैरो हवाई तळावर भारतीय वायुदलाचा ब्राईट स्टार-23 युद्धसरावात सहभाग

इजिप्तमधील कैरो हवाई तळ येथे 27 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2023 दरम्यान होत असलेल्या ब्राईट स्टार -23 या द्वैवार्षिक बहुस्तरीय त्रिसेवा युद्ध सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय वायूदलाच्या तुकडीने आज उड्डाण केले.

भारतीय वायूदल पहिल्यांदाच ब्राइट स्टार-23मध्ये सहभागी होत असून यात अमेरिका,सौदी अरेबिया, ग्रीस आणि कतारच्या तुकड्याही सहभागी होत आहेत. भारतीय वायुदलाच्या तुकडीत पाच MIG-29, दोन IL-78, दोन C-130 आणि दोन C-17 या विमानांचा समावेश आहे. भारतीय वायू दलाच्या गरुड विशेष दलाचे जवान तसेच 28, 77, 78 आणि 81 या तुकड्यांमधील जवानही या युद्धसरावात सहभागी होत आहेत. भारतीय लष्कराच्या दीडशे जवानांनाही आपल्या सोबत घेऊन भारतीय वायूदलाचे परिवहन विमान उड्डाण करणार आहे.

कसरतींचे नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करणे हा या युद्धसरावाचा उद्देश आहे. सीमेपलीकडल्या देशांमध्ये परस्पर संबंध स्थापित करण्यासोबतच सहभागी झालेल्या देशांचे धोरणात्मक संबंध या कसरतींमुळे दृढ व्हायला सहाय्य मिळणार आहे. भारतीय वायूदलाच्या सरावासाठी परदेशात उड्डाण करत आलेली तुकडी ही वायूदलाच्या वरिष्ठ रजनैतिक अधिकाऱ्यांच्या समकक्ष मानली जाते.

भारत आणि इजिप्तमध्ये याआधीही 1960 दरम्यान दोन्ही देश हवाई इंजिन आणि विमानाचा विकास करत असताना संबंध प्रस्थापित झाले होते. त्यावेळी इजिप्तच्या वैज्ञानिकांना भारतीय वैमानिकांना प्रशिक्षणही दिले होते. या दोन देशांमधले नातेसंबंध नुकत्याच झालेल्या दोन्ही देशांच्या वायूदल प्रमुखांच्या भेटींमधून तसेच भारतीय संरक्षण मंत्री आणि पंतप्रधानांच्या इजिप्त भेटीनंतर अधिकच प्रगल्भ झाले आहेत. या दोन्ही देशांनी त्यांच्या सशस्त्र दलांचे संयुक्त प्रशिक्षण नियमित युद्धसरावांच्या सहाय्याने आणखी मजबूत केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.